गृह मंत्रालय

पंतप्रधानांच्या सुचनेनुसार लॉक डाऊनच्या काळात स्थलांतरीत मजुरांना सर्व सहाय्य करण्यासाठी सरकार कटीबद्ध- श्री अमित शहा


स्व राज्यात परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांना अन्न आणि निवारा पुरवण्याकरिता महामार्गालगत मदत छावण्या उभारण्यासाठी राज्य सरकारांना सूचना

Posted On: 28 MAR 2020 8:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 मार्च 2020

 

लॉक डाऊनच्या काळात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार, स्थलांतरीत मजुरांना सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा ते आज आढावा घेत होते. 

स्थलांतरित मजुराना आवश्यक ते सर्व सहाय्य पुरवण्यावर केंद्र सरकारचा कटाक्ष असून लॉकडाऊन काळात स्व राज्यात परतणाऱ्या स्थलांतरित मजुर तसेच यात्रेकरूसाठी तातडीने मदत छावण्या उभारण्याची विनंती करणारे पत्र केंद्रीय गृह सचिवांनी, राज्यांना पुन्हा लिहिले आहे.

या मदत छावण्याचे ठिकाण, त्यामध्ये उपलब्ध सुविधा, प्रधान मंत्री गरीब कल्याण योजन अंतर्गत मदतीचे पॅकेज,राज्य प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना, याबाबत राज्य सरकारांनी, सार्वजनिक प्रसारण यंत्रणा, तंत्रज्ञान आणि स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संघटना यांच्या मदतीने व्यापक प्रसिद्धी द्यावी, अशा सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत.  

महामार्गावरून जाणाऱ्यासाठी, महामार्गालगत मदत छावण्या उभारण्याच्या सूचनाही राज्यांना देण्यात आल्या आहेत. लॉक डाऊन लागू असेपर्यंत या लोकांनी या छावण्यातच राहावे या दृष्टीने  तंबूची निवासव्यवस्था उभारावी, असेही म्हटले आहे.  सोशल डीस्टन्सिंग अर्थात व्यक्ति-व्यक्तिमध्ये सुरक्षित अंतर राखण्यासह विलगीकरण  किंवा रुग्णालयात पाठवण्याची आवश्यकता असणाऱ्या व्यक्ती निश्चित करण्यासाठी वैद्यकीय तपासणी अभियान यासह इतर खबरदारी घेऊनच हे निवारे असावेत.

मदतीच्या अशा उपाययोजना करण्यासाठी राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधीचा उपयोग करण्याचे अधिकार, केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत.

 

 

U.Ujgare/N.Chitale/D.Rane



(Release ID: 1608914) Visitor Counter : 185


Read this release in: English