सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

देशातील संपूर्ण बंदीच्या काळात दिव्यांग व्यक्तींसाठी किमान आवश्यक सुविधा सुनिश्चित करण्याची दिव्यांग सबलीकरण विभागाची गृह व्यवहार मंत्रालयाला विनंती

Posted On: 28 MAR 2020 3:53PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 28 मार्च 2020

 

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे सुरु असलेल्या संपूर्ण बंदीच्या कालावधीत  देशातील दिव्यांग नागरिकांना किमान आवश्यक सुविधांचा पुरवठा सुनिश्चित करण्याची विनंती सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग सबलीकरण विभागाने गृह व्यवहार मंत्रालयाला केली आहे. दिव्यांग सबलीकरण विभागाच्या सचिवांनी गृह व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे.

धोकादायक परिस्थितीमध्ये दिव्यांग व्यक्तींना असुरक्षितता वाटते तसेच त्यांच्या दुर्बलतेमुळे त्यांना काळजी आणि आधाराची सतत गरज भासते, त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी देखील त्यांना काळजीवाहक, मदतनीस आणि इतर आधार देणाऱ्यांची सतत आवश्यकता भासते. देशातील बंदीच्या काळात संचारबंदीमुळे वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्यामुळे दिव्यांग व्यक्तींची काळजी घेणारे मदतनीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत किंवा दिव्यांग व्यक्तींच्या निवासस्थानापर्यंत पोहोचताना अनेक अडचणी येत आहेत, अशा आशयाच्या अनेक व्यथा सांगणारे फोन दिव्यांग सबलीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना येत आह सामाजिक व्यवहार करताना योग्य अंतर राखण्याचे  नियम कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच केले आहेत ते कसोशीने पाळले जात आहेत. मात्र त्याच वेळी, दिव्यांग जनांना आवश्यक असलेल्या सेवा सुविधांच्या खात्रीशीर पुरवठ्याची जबाबदारी देखील सरकारवर आहे. त्यामुळे गृह व्यवहार मंत्रालयाने तातडीची पावले उचलत, सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रशासनाच्या कायदे विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या अखत्यारीतील विभागात वास्तव्य करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना मदत करणाऱ्या सर्व काळजीवाहक तसेच मदतनीसांना परवानापत्रे देण्यासाठी आवश्यक सूचना द्याव्यात अशी मागणी या पत्राद्वारे मांडण्यात आली आहे. यासाठी दिव्यांग जनांशी संपर्क असणारे जिल्हा अधिकारी किंवा स्थानिक पोलिसांची मदत घेता येईल असे या पत्रात सुचविण्यात आले आहे.

 

G.Chippalkatti/S.Chitnis/P.Kor



(Release ID: 1608840) Visitor Counter : 163


Read this release in: English