पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांचा रेडिओ जॉकींशी संवाद


कोविड -19: मुळे उद्भवलेल्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सकारात्मकतेसह एकजुटतेची  वृत्ती महत्वपूर्ण -पंतप्रधान

आरजे हे कोट्यवधी भारतीय कुटुंबातील सदस्यांसारखे आहेत - त्यांनी सकारात्मकतेचा संदेश प्रसारित करायला हवा - पंतप्रधान

राष्ट्रीय स्तरावर  स्थानिक नायकांचे योगदान सातत्याने साजरे करण्याची आणि त्यांचे मनोबल वाढविण्याची गरज : पंतप्रधान

2014;पासून पंतप्रधान एमकेबी सादर  करीत असल्याने पंतप्रधान त्यांच्या क्षेत्राचे सदस्य असल्याचे आरजे कडून  मत व्यक्त ; कोविड -19 विरोधातील लढाईत देशाचा आवाज बनण्याची प्रतिज्ञा करा

Posted On: 27 MAR 2020 8:21PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 27 मार्च 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रेडिओ जॉकी (आरजे) शी संवाद साधला.

कोविड-19 बद्दल जनजागृती करण्यासाठी आरजेनी पार पाडलेल्या भूमिकेचे पंतप्रधानांनी कौतुक केले. ते म्हणाले की हे कौतुकास्पद आहे की लॉकडाऊनमध्येही आरजे आपली जबाबदारी पार पाडत आहेत आणि घरून कार्यक्रम ध्वनिमुद्रित करत आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, विविध कार्यक्रमांमधून लोकांपर्यंत पोहचणारे आरजे हे कोट्यवधी भारतीय कुटुंबातील सदस्यांसारखे आहेत. लोक त्यांचे केवळ ऐकतच नाहीत तर त्यांचे अनुसरण देखील करतात. अंधश्रद्धा पसरविण्यापासून रोखणे आणि  लोकांना प्रेरित देखील करणे ही आरजेची मोठी जबाबदारी आहे

तज्ज्ञांचे मत आणि सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रसारित करण्याबरोबरच  पंतप्रधानांनी आरजेना जनतेला भेडसावणा समस्या आणि आव्हानांबद्दल अभिप्राय देण्याची विनंती केली, जेणेकरुन सरकार त्यांचे  निराकरण करू शकेल.

पंतप्रधानांनी आरजेना सकारात्मक कथा आणि केस स्टडीज प्रसारित करण्याचे आवाहन केले, विशेषत: अशा रूग्णांच्या जे  कोरोना विषाणूच्या संसर्गातून पूर्णपणे बरे झाले आहेत , तसेच देशातील वेगवेगळ्या भागांत अशा कथा पोहचवून संपूर्ण देशाला एकत्र आणण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच राष्ट्रीय  पातळीवर पोलिस अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉईज आदी स्थानिक नायकांचे योगदान नियमितपणे साजरे करायलाही  सांगितले.

सहानुभूतीचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, विषाणूने  बाधित होण्याच्या सामाजिक भीतीमुळे डॉक्टर, आरोग्य सेवा कर्मचारी आणि विमानसेवा कर्मचार्‍यांशी गैरवर्तन होत असल्याच्या गोष्टी सांगणे महत्वाचे आहे, जेणेकरुन अशा आव्हानांवर मात करता येईल. जनतेच्या मदतीसाठी निरंतर कार्यरत असणाऱ्या  पोलिस कर्मचार्‍यांच्या समर्पणाविषयी जनतेला शिक्षित करण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की  जनतेने पोलिसांना सहकार्य केले पाहिजे आणि पोलिसांनी सशस्त्र युक्तीचा वापर टाळताना  शिस्त पाळणे देखील आवश्यक आहे. 130 कोटी भारतीयांनी महामारीशी लढण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणून काम केले पाहिजे.

पंतप्रधान म्हणाले की, या कठीण काळात गरीब आणि वंचितांना मदत करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजनांची घोषणा केली आहे. या घोषणांची माहिती जलद आणि वेळेवर  लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे महत्वाचे आहे. पंतप्रधान म्हणाले की सामूहिक संवादक म्हणून आरजे त्यांच्या श्रोत्यांना या घोषणांविषयी माहिती देण्याबरोबरच सामाजिक अंतर राखणे आणि स्वत: ला वेगळे ठेवण्याचे महत्त्व विशद करण्यात  सक्रिय भूमिका बजावू शकतात.

यावर उत्तर देताना,  2014. पासून रेडिओवर  'मन की बात' हा अतिशय यशस्वी कार्यक्रम सादर करत असल्यामुळे पंतप्रधान हे आरजे बिरादरीचा एक भाग आहेत असे आरजेंनी सांगितले. पंतप्रधानांनी 'जनता कर्फ्यू' च्या केलेल्या आवाहनाला आणि कोविड विरोधात लढणाऱ्या आघाडीच्या सर्व योद्धांचे आभार मानण्याच्या त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आरजेंनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि या महामारी विरूद्ध लढाईत देशाचा आवाज बनण्याची भूमिका पार पाडताना आनंद होईल, असे सांगितले.

पंतप्रधान म्हणाले की अफवांचा प्रसार थांबविण्यात सार्वजनिक प्रसारक आकाशवाणी महत्वाची भूमिका बजावू शकते. तसेच त्यांनी आरजेना  विनंती केली की त्यांनी अफवा पसरण्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनेही काम करावे.

पंतप्रधानांनी आरजेना  समाजात विधायक आणि सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याच्या दृष्टीने कार्य करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, ‘कोविड -19’  मुळे  उद्भवलेल्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सकारात्मकतेसह एकजुटतेची वृत्ती महत्वपूर्ण आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री तसेच माहिती आणि  प्रसारण मंत्रालयाचे सचिव हे देखील या संवादात सहभागी झाले होते.

 

BGokhale/S.Kane/P.Kor



(Release ID: 1608646) Visitor Counter : 205


Read this release in: English