उपराष्ट्रपती कार्यालय

पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीला, उपराष्ट्रपतींनी दिले एक महिन्याचे वेतन

Posted On: 27 MAR 2020 7:43PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 27 मार्च 2020

 

देशात पसरलेल्या कोविड- 19 महामारीला रोखण्यात सरकारतर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना बळकटी देण्यासाठी उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष एम.वेंकय्या नायडू यांनी एक महिन्याच्या वेतनाइतकी रक्कम पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीत आज जमा केली आहे.

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि कोविड- 19 ही महाकाय नैसर्गिक आपत्ती असून यात जगभरात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या महामारीला तोंड देण्यासाठी नियमितपणे ठोस उपाययोजना केल्या जात आहेत आणि या प्रयत्नात माझा हा खारीचा वाटा आहे असे नायडू यांनी या पत्रात म्हटले आहे. 

 

R.Tidke/V.Joshi/P.Kor


(Release ID: 1608626) Visitor Counter : 121


Read this release in: English