उपराष्ट्रपती कार्यालय

कोविड -19 विरोधात लढा देण्याबाबत उपराष्ट्रपतींनी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपाल आणि नायब राज्यपालांशी संवाद साधला


जनतेत जागरूकता वाढविण्यासाठी, नागरी समाज संघटनांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि खासगी क्षेत्राला सरकारबरोबर भागीदारी करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे केले आवाहन

Posted On: 27 MAR 2020 4:46PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 27 मार्च 2020

 

उपराष्ट्रपती  एम. वेंकैया नायडू यांनी आज राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचे राज्यपाल आणि नायब राज्यपाल तसेच  प्रशासक यांना जनतेमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी , नागरी समाज संघटनांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि खाजगी क्षेत्राला कोविड -19 विरोधातील लढ्यात सरकारबरोबर भागीदारी करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. .

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी बोलावलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपाल आणि नायब राज्यपालांशी संवाद साधताना उपराष्ट्रपती म्हणाले कि आपापल्या राज्यांचे पहिले नागरिक म्हणून या राष्ट्रीय संकटाच्या क्षणी संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्यात या सर्वांना अतिशय सर्जनशील भूमिका.पार पाडता येईल.

ते म्हणाले, "तुमचे नेतृत्व महत्त्वपूर्ण आहे आणि तुमचे  मार्गदर्शन, सुविधा आणि प्रेरणा देण्याची क्षमता सर्वाधिक मौल्यवान ठरू शकते."

  विद्यापीठे, केंद्रीय विद्यालय, इतर शैक्षणिक संस्था आणि धार्मिक संस्था यांच्यासारख्या नवीन भागीदारांनी या आपत्कालीन  कार्यात कोविड -19  रुग्णांसाठी अलगीकरण वॉर्डसाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी त्यांना राज्यपाल आणि नायब राज्यपालांनी प्रोत्साहित करावे असे मत नायडू यांनी व्यक्त केले.

विविध विद्यापीठांचे कुलपती म्हणून शैक्षणिक वेळापत्रकाला बाधा पोहचणार नाही याची काळजी घेऊन  अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन वर्ग घेण्याची शक्यता पडताळून पाहण्याची सूचना त्यांनी केली.

कोव्हीड -19 रूग्णांसाठी काही खाटा राखून ठेवण्याचे आवाहन त्यांनी खासगी रुग्णालयांना केले.आणि रेडक्रॉससह नागरी समाज संस्थांनी आपल्या  लोकसंख्येतील  गरीब, वृद्ध आणि आजारी सदस्यांसाठी मानवतावादी मदत उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक करताना उपराष्ट्रपतींनी या कठीण प्रसंगी टीम इंडिया भावनेचा अवलंब करण्यावर भर दिला.

संक्रमणाचे  चक्र मोडीत काढण्यासाठी सामाजिक अंतराचे महत्त्व सांगताना उपराष्ट्रपतींनी “तुम्ही बाहेर पडाल तर कोरोना आत येईल” या शब्दातून पंतप्रधानांनी  घरीच राहण्याच्या  केलेल्या आवाहनाची राज्यपालांना आठवण करून दिली .

उपराष्ट्रपतींनी राज्यपालांना आणि नायब राज्यपालांना धार्मिक आणि आध्यात्मिक नेते, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध भाषांमधील साहित्यिक आणि कलाकार यांच्यासारख्या  सुप्रसिद्ध  व्यक्तिमत्त्वांना कोविड-19.विरोधातील लढ्यात  सामील करून घेण्याचे आवाहन केले.

नायडू यांनी पायाभूत सुविधा आणि  संसाधने असलेल्या खासगी क्षेत्राला सरकारच्या प्रयत्नांना पूरक प्रयत्न करण्यात आणि लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी अधिक सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले.

महत्त्वपूर्ण आरोग्य संदेश प्रसारित करण्यात माध्यमांनी त्यांची भूमिका प्रभावीपणे बजावल्याबद्दल त्यांचे कौतुक करताना उपराष्ट्रपती म्हणाले की लोकांना विश्वासार्ह माहिती पुरवणे महत्वाचे आहे.

आपल्या सामाजिक पिरॅमिडच्या तळाशी असलेल्या लोकांवर या लॉकडाऊनचा आर्थिक परिणाम होऊ शकतो, असे नमूद करून उपराष्ट्रपतींनी गरीब लोक आणि आरोग्य कर्मचार्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी केंद्र  सरकारने जाहीर केलेल्या उपाययोजनांच्या पॅकेजचे स्वागत केले.

सर्व ठिकाणी दूध, फळे आणि भाजीपाला व इतर शेतमाल यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्याचे आवाहन त्यांनी केंद्र आणि राज्य अधिका ऱ्यांना  केले.

कोविड -19  च्या संसर्गाशी लढा देण्यासाठी लोकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे हे लक्षात घेऊन उपराष्ट्रपतींनी सर्व नागरिकांना सरकारने ठरविलेल्या खबरदारीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. त्यांनी कुटुंबातील मुले आणि वडिलधाऱ्यांसमवेत वेळ व्यतित करण्याबरोबरच  पुस्तके वाचणे, ध्यान साधना आणि योगा अशा विविध समृद्ध उपक्रमांत  वेळ खर्ची करण्याचा सल्ला दिला.

महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, हरियाणा, गुजरात, राजस्थान, तेलंगणा, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश या राज्यांचे राज्यपाल , दिल्लीचे नायब राज्यपाल  आणि चंडीगडचे प्रशासक आणि अन्य  या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Kor


(Release ID: 1608553) अभ्यागत कक्ष : 190
Read this releasein: English