संरक्षण मंत्रालय
कोविड-19 महामारीच्या मुकाबल्यासाठी भारतीय हवाईदलाचे नागरिकांना सर्वतोपरी सहाय्य्य
Posted On:
26 MAR 2020 8:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मार्च 2020
देशातील भारतीय हवाईदलाच्या मुख्य तळांवर 200 ते 300 रुग्णांची क्षमता असलेले 9 विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत.
बंगलोरमधील भारतीय हवाईदलाचे कमांड रुग्णालय ही हवाईदलाची कोविड-19 परिक्षणाची पहिली प्रयोगशाळा ठरली आहे ज्याद्वारे संशयित रुग्णाची त्वरित चाचणी करून गरजेनुसार त्याला वेळेवर औषधोपचार देणे शक्य होणार आहे.
सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार मदतीसाठी हवाईदलाच्या मुख्यालयात आणि विविध कमांड मुख्यालयात दररोज 24 तास कार्यरत असणारा आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आला आहे. वैद्यकीय सुविधा आणि डॉक्टरांना घेऊन भारतीय हवाईदलाची विमाने लेह ला नियमित जात असून रुग्णांच्या रक्ताचे नमुने कोविड चाचणीसाठी चंदिगढ आणि दिल्लीला नेत आहेत.
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना आणि निर्देशांचे पालन भारतीय हवाईदल करीत आहे.
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या या लढाईत भारतीय हवाईदल सरकारसोबत असून देशवासियांना शक्य ती सर्व मदत करणार आहे.
U.Ujagare/V.Joshi/P.Kor
(Release ID: 1608497)
Visitor Counter : 138