शिक्षण मंत्रालय

केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाच्या नॅशनल बुक ट्रस्ट कडून #StayHomeIndiaWithBooks उपक्रमाचा प्रारंभ


नॅशनल बुक ट्रस्टच्या संकेत स्थळावरून 100 पेक्षा जास्त पुस्तके पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करता येणार

Posted On: 25 MAR 2020 8:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 मार्च 2020

 

कोविड-19 चा प्रसार  रोखण्यासाठी, केंद्रसरकारच्या उपाययोजनांना अनुसरून आणि लोकांनी घरी राहावे   यासाठीच्या #StayIn  आणि  #StayHome  करिता प्रोत्साहन मिळावे म्हणून केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाच्या नॅशनल बुक ट्रस्टने #StayHomeIndiaWithBooks हा उपक्रम आणला आहे. घरीच राहून पुस्तके वाचण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्याकरितानॅशनल बुक ट्रस्टने आपली जास्त खप असलेली पुस्तके  विनामुल्य डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नॅशनल बुक ट्रस्टच्या  https://nbtindia.gov.in  या संकेत स्थळावरून 100 पेक्षा जास्त पुस्तके पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करता येणार आहेत. चरित्र, लोकप्रिय विज्ञानकल्पनात्मक पुस्तकांचा यात समावेश असून  हिंदी, इंग्रजी, मराठी,आसामी, बांगला,गुजराती, मल्याळी, ओडिया,कोकबोरोकमिझो,बोडो,नेपाळी,तमिळ,पंजाबी,तेलगु, कन्नड,उर्दू आणि संस्कृत भाषेत ही पुस्तके उपलब्ध आहेत. यातली बहुतांश पुस्तके मुले आणि युवकांसाठी आहेत.याशिवाय टागोर,प्रेमचंद आणि महात्मा गांधी यांची पुस्तकेही संकेत स्थळावर उपलब्ध असून कुटुंबातला प्रत्येक सदस्य या पुस्तकांच्या वाचनाचा आनंद घेऊ शकतो. पुस्तकांच्या सूचीमध्ये आणखी पुस्तकांचा समावेशही होणार आहे.  

हॉलिडेज हॅव कम, नाईन लिटील बर्डस,गांधी-वारियर ऑफ नॉन व्हायोलन्स, ए टच ऑफ ग्लास,या पुस्तकांचा यात समावेश आहे. पीडीएफ केवळ वाचनासाठी उपलब्ध आहे. अनधिकृत आणि वाणिज्यिक  वापरासाठी परवानगी  नाही.

 

R.Tidke/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1608424) Visitor Counter : 161


Read this release in: English