आदिवासी विकास मंत्रालय

कोविड-19 मुळे उद्‌भवलेल्या आकस्मिक आरोग्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी व्यवहार मंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना ईएमआरसी/ईएमडीबीएस मधील सुटीचे वेळापत्रक पुन्हा आखण्यास सांगितले

Posted On: 26 MAR 2020 8:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 मार्च 2020

आदिवासी व्यवहार मंत्रालयाने एकलव्य मॉडेल निवासी शाळा असलेल्या सर्व राज्यांच्या आदिवासी विकास विभागाला पत्र लिहून,एकलव्य मॉडेल निवासी शाळा (ईएमआरसी) आणि एकलव्य मॉडेल डे बोर्डिंग शाळांमधील (ईएमडीबीएस)सुटीचे वेळापत्रक पुन्हा आखण्यास सांगितले आहे.

या शाळांना आदिवासी व्यवहार मंत्रालयातर्फे आर्थिक सहाय्य दिले जाते. या राज्यांच्या आदिवासी विकास विभागाचे प्रभारी प्रधान सचिव / प्रभारी सचिव यांना लिहिलेल्या पत्रात मंत्रालयाने म्हटले आहे की, कोविड -19 (कोरोना विषाणू) मुळे समाजाच्या आरोग्यावर परिणाम होणारी संवेदनशील आरोग्य परिस्थिती लक्षात घेता हे दिसून आले आहे की, संसर्ग पसरू नये म्हणून स्थानिक प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. काही प्रकरणांमध्ये नियोजित वार्षिक परीक्षा पूर्ण करण्याचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत.

आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता आदिवासी व्यवहार मंत्रालयाने, मंत्रालयाद्वारे वित्तिय अर्थसहाय्य दिले जाणाऱ्या एकलव्य मॉडेल निवासी शाळा (ईएमआरएस) आणि एकलव्य मॉडेल डे बोर्डिंग शाळे (ईएमडीबीएस) मधील सुट्टीचे वेळापत्रक आखण्याबाबत खालील सूचना जारी केल्या आहेत.

  • विशेष परिस्थितीत उन्हाळ्याची सुट्टी जाहीर आणि 21 मार्च 2020 ते 25 मे 2020 (65 दिवस) किंवा पुढील आदेश येईपर्यंत जे आधी होईल तोपर्यंत शाळा बंद राहतील.
  • या कालावधीत बाहेरील कोणत्याही व्यक्तीस कॅम्पस मध्ये प्रवेश बंदी असेल.
  • बोर्डाची परीक्षा देणाऱ्या आणि विशेष वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष काळजी घेऊन कॅम्पसमध्ये राहता येईल. बोर्डाची परीक्षा देणाऱ्या या विद्यर्थ्यांना त्यांचा संबंधित पेपर झाल्यावर घरी पाठविले जाईल.
  • शैक्षणिक विभाग, वसतिगृह आणि इतर सामायिक जागांसह शाळा परिसर स्वच्छ करण्यासाठी विशेष उपक्रम राबविला जाऊ शकतो.

वरील बाबींव्यतिरिक्त खालील मुद्दे देखील सुनिश्चित केले जाऊ शकतात:

  1. यासंदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन केले जाऊ शकते.
  2. निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षक सुट्टीचा लाभ घेऊ शकतात. विद्यार्थ्यांना टपाल आणि एसएमएस द्वारे निकाल कळवला जाऊ शकतो.
  3. सुट्टीसाठी नियोजित सर्वसाधारण उपक्रम सुट्टीच्या कालावधीत घेण्यात येतील जेणेकरून नवीन सत्र सुरू करण्यासाठी कॅम्पस तयार असेल.
  4. इयत्ता 6 वी मधील विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि इयत्ता नववी आणि अकरावी मधील प्रवेशदेखील शाळा पुन्हा सुरू होण्यापूर्वी या कालावधीत सर्व बाबतीत पूर्ण केले जातील.

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 



(Release ID: 1608409) Visitor Counter : 139


Read this release in: English