गृह मंत्रालय
कोविड-19 महामारीमुळे 2021च्या जनगणनेचा पहिला टप्पा आणि एनपीआर अद्ययावत करण्याचे काम पुढील आदेशापर्यंत लांबणीवर
प्रविष्टि तिथि:
25 MAR 2020 6:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मार्च 2020
2021 च्या जनगणनेचे काम दोन टप्प्यात सुरु करण्यात येणार होते. गृह सूची आणि गृह गणना हा पहिला टप्पा एप्रिल-सप्टेंबर 2020 या काळात तर जनसंख्या गणना हा दुसरा टप्पा 9 ते 28 फेब्रुवारी 2021 या काळात नियोजित होता. 2021 च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याबरोबरच, आसाम वगळता सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी पुस्तिका अद्ययावत करण्याचे कामही हाती घेण्यात येणार होते.
कोविड-19 महामारीमुळे, केंद्र शासनासह राज्य सरकारांनीही हाय अलर्ट जारी केला आहे. केंद्र सरकारची विविध मंत्रालये, राज्य/केंद्रशासित प्रदेशानी, कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाय योजनांची कठोर अंमलबजावणी करण्यासंदर्भात, केंद्रीय गृह मंत्रालयाने 24 मार्च 2020 ला मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. लॉक डाऊनची घोषणा झाली असून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोशल डीस्टन्सिग सह अनेक खबरदारीच्या उपाय योजनांसाठी सूचना जारी केल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर,1 एप्रिल 2020 पासून सुरु होणारा, 2021 च्या जनगणनेचा पहिला टप्पा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी पुस्तिका अद्ययावत करण्याचे काम पुढील आदेशापर्यंत लांबणीवर टाकण्यात आले आहे.
G.Chippalkatti /N.Chitale/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1608360)
आगंतुक पटल : 300
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English