मंत्रिमंडळ

गारमेंट्स आणि मेड-अप्सच्या निर्यातीवरील  करातील सवलतीला मुदतवाढ द्यायला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 25 MAR 2020 7:56PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 25 मार्च 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 एप्रिल 2020 पासून राज्य आणि केंद्रीय कर आणि शुल्क (आरओएससीटीएल) सवलती सुरू ठेवायला मान्यता दिली आहे.  निर्यात केलेल्या उत्पादनांवरील  (RoDTEP)  कर आणि शुल्क परताव्याशी या योजनेचे विलीनीकरण होत नाही तोपर्यंत ही सवलत असेल.

तयार कपडे आणि मेड-अपसाठी आरओएससीटीएल योजना 1 एप्रिल 2020  पासून लागू केली जाईल. आरओडीटीपीमध्ये आरओएससीटीएल विलीन होईपर्यंत वस्त्रोद्योग मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या मार्गदर्शक सूचना आणि दरामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.

31 मार्च 2020 नंतर आरएससीटीएल सुरू ठेवून सध्या कोणत्याही अन्य प्रणालीत  सूट न मिळालेल्या सर्व कर / शुल्कात सवलत देऊन वस्त्रोद्योग क्षेत्र स्पर्धात्मक बनविणे अपेक्षित आहे.

 

U.Ujagare/S.Kane/P.Kor



(Release ID: 1608168) Visitor Counter : 77


Read this release in: English