मंत्रिमंडळ

भारत आणि जर्मनी दरम्यान रेल्वे क्षेत्रातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 25 MAR 2020 7:50PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला रेल्वे  क्षेत्रातील तांत्रिक सहकार्यासाठी रेल्वे मंत्रालय, भारत सरकारआणि जर्मनीच्या डीबी अभियांत्रिकी आणि सल्लागार जीएमबीएच यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराबाबत अवगत करण्यात आले.  फेब्रुवारी 2020 मध्ये या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

 

तपशील :

रेल्वे क्षेत्रातील तंत्रज्ञानविषयक सहकार्यासाठी करण्यात आलेल्या या सामंजस्य करारामुळे पुढील क्षेत्रात सहकार्य शक्य होईल-

मालवाहतूक परिचालन, (सीमेपलिकडून वाहतूक, ऑटोमोटिव्ह ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिकसह)

प्रवासी सेवा (अतिजलद आणि सीमेपलिकडील वाहतुकीसह),

पायाभूत सुविधा निर्मिती आणि व्यवस्थापन (समर्पित मालवाहतूक मार्गिका आणि प्रवासी स्थानकांच्या विकासासह),

आधुनिक, स्पर्धात्मक रेल्वे संघटनेचा विकास (संघटनात्मक संरचना सुधारणा आणि रेल्वे पुनर्रचनेसह  )

रेल्वे परिचालनविपणन आणि विक्री तसेच प्रशासकीय हेतूंसाठी माहिती तंत्रज्ञान उपाययोजना

भविष्यातील समस्या ओळखून त्यादृष्टीने देखभाल,

 खासगी रेल्वे परिचालन आणि

इतर कोणत्याही क्षेत्रात ज्यात दोन्ही बाजूंकडून लेखी परस्पर सहमती असेल.

पार्श्वभूमी

रेल्वे मंत्रालयाने रेल्वे क्षेत्रातील तांत्रिक सहकार्यासाठी विविध देशांची सरकारे  आणि राष्ट्रीय रेल्वे बरोबर  सामंजस्य करार (एमओयू) / सहकार्य करार  (एमओसी) / प्रशासकीय व्यवस्था (ए.ए.) / संयुक्त घोषणापत्र  (जेडीआय) आदींवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सहकार्याची निवडक क्षेत्रे, ज्यात अतिजलद रेल्वे, विद्यमान मार्गांची गती वाढवणे, जागतिक दर्जाच्या स्थानकांचा विकास, अधिक क्षमतेची मालवाहतूक  आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण इ. समाविष्ट आहे.

 

U.Ujagare/S.Kane/P.Kor



(Release ID: 1608166) Visitor Counter : 157


Read this release in: English