पंतप्रधान कार्यालय
उद्योग क्षेत्रातील हितधारकांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
असंघटित क्षेत्राच्या गरजांबाबत एकसुरात बोलल्याबद्दल पंतप्रधानांनी उद्योग क्षेत्रातील नेत्यांचे केले कौतुक ; आर्थिक एकात्मिकतेची ही नवीन पहाट असल्याचे सांगितले
घरून काम करायला प्रोत्साहन द्या, कोविड -19 चा सामना करण्यासाठी सामाजिक अंतर हे एक मोठे शस्त्र -पंतप्रधान
व्यवसायावर नकारात्मक प्रभाव पडला तरी कर्मचारी कपात न करण्याचा पंतप्रधानानी उद्योग क्षेत्रातील हितधारकांना दिला सल्ला
सक्रिय नेतृत्वाबद्दल उद्योग प्रतिनिधीनी पंतप्रधानांचे मानले आभार , कोविड -19 आव्हानाचा सामना करण्यासाठी सुचवल्या कल्पना आणि सूचना
Posted On:
23 MAR 2020 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मार्च 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील अठरा शहरांमधील असोचॅम, फिक्की, सीआयआय आणि अनेक स्थानिक चेंबरमधील उद्योग प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
पंतप्रधान म्हणाले की, सरकार जेव्हा देशातील विकासाच्या गतीला चालना देण्याचे काम करत होते, तेव्हा कोविड -19 च्या रूपाने एक अनपेक्षित अडथळा अर्थव्यवस्थेसमोर आला. ते म्हणाले की महामारीमुळे उद्भवलेले आव्हान हे जागतिक महायुद्धांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांपेक्षा गंभीर आहे आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी आपण सतत दक्ष राहण्याची गरज आहे.
पंतप्रधान म्हणाले की विश्वास हा अर्थव्यवस्थेचा आधार आहे. विश्वासाचे एक वेगळेच मोजमाप असते. कठीण आणि आव्हानात्मक काळात तो कमावला जातो किंवा गमावला जातो. अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमधील विश्वासाचे मापदंड महत्वपूर्ण टप्प्यावर आहेत. ते म्हणाले की, कोविड -19 मुळे पर्यटन, बांधकाम, आतिथ्य आणि अनौपचारिक क्षेत्रासह दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक बाबींना फटका बसला आहे. आगामी काळात अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम जाणवेल.
या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांनी आघाडीवरून नेतृत्व केल्याबद्दल आणि त्वरेने सक्रिय कारवाई केल्याबद्दल उद्योग प्रतिनिधींनी त्यांचे आभार मानले.आवश्यक वस्तू आणि व्हेन्टिलेटरसह वैद्यकीय उपकरणाचा पुरवठा कायम ठेवण्यासाठी, वेगळे वॉर्ड तयार करण्यात मदत करणे, कोविड-19 चा सामना करण्यासाठी सीएसआर निधीचा वापर आणि स्थलांतरित कामगारांना मदतीची तरतूद यासाठी केलेल्या उपाययोजनांची त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.
बँकिंग, वित्त, आतिथ्य, पर्यटन, पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रांना भेडसावणाऱ्या विशिष्ट समस्यांवर त्यांनी चर्चा केली आणि आर्थिक आणि वित्तीय मदतीद्वारे या आव्हानांवर मात करण्यासाठी मदतीची विनंती केली. उद्योग प्रतिनिधींनी देखील आर्थिक नुकसान विचारात न घेता, या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन, करण्याच्या निर्णयाचे प्रशंसा केली. .
असंघटित क्षेत्राच्या गरजांवर एका सुरात बोलल्याबद्दल पंतप्रधानांनी उद्योग प्रतिनिधींचे आभार मानले आणि सांगितले की यामुळे आर्थिक एकीकरणाची नवी पहाट झाली आहे. त्यांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जेथे शक्य असेल तेथे कर्मचार्यांना घरून काम करण्याची परवानगी द्यायची सूचना केली. त्यांनी प्रतिनिधींना मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारण्याचे आणि त्यांच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम झाला तरी कर्मचार्यांची कपात न करण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले की, अत्यावश्यक वस्तूंच्या उत्पादनावर सध्या परिणाम होऊ नये आणि काळा बाजार आणि साठवणुकीला आळा घालणे सद्यपरिस्थितीत आवश्यक आहे. त्यांनी त्यांना ‘स्वच्छते’ चे महत्त्व आणि कारखाने, कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्याची आठवण करून दिली. ते पुढे म्हणाले की, विषाणूचा प्रसार रोखण्याच्या विरोधात लढा देण्यासाठी सामाजिकदृष्ट्या अंतर राखणे हे आपले सर्वात मोठे शस्त्र आहे. या कठीण प्रसंगी महामारी संबंधी मानवतेच्या कारणांसाठी सीएसआर निधी वापरण्याची विनंती त्यांनी केली.
प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे सचिव, या संवादात सहभागी झाले होते.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
(Release ID: 1607941)
अभ्यागत कक्ष : 161