पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान आणि अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
24 MAR 2020 3:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नवरोझच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले कि हा सण दोन्ही देशांमधील सामायिक वारसा आणि सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक आहे.
दोन्ही नेत्यांनी कोविड-19 महामारी संदर्भात उद्भवलेल्या परिस्थितीवर विशेष चर्चा केली आणि सहकार्याला चालना देण्यासाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1607915)
आगंतुक पटल : 175
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English