पंतप्रधान कार्यालय

कोरोना विषाणूशी लढणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केल्याबद्दल पंतप्रधानांनी जनतेला दिले धन्यवाद

Posted On: 22 MAR 2020 9:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 मार्च 2020

कोरोनाविषाणूशी लढा देण्यात आघाडीवर असणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केल्याबद्दल पंतप्रधानांनी जनतेला धन्यवाद दिले आहेत. ट्विटर संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान लिहितात, कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईचे नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देशाने धन्यवाद दिले आहेत. देशवासीयांचे खूप खूप आभार.

हा कार्यक्रम म्हणजे, कोविड -19 संकटाविरुद्धच्या प्रदीर्घ लढाईतील विजयाची नांदी होती’, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. जनतेने अजूनही तितक्याच निग्रह आणि निश्चयाने सामाजिक ठिकाणी व्यक्ती-व्यक्तींमध्ये अंतर राखण्याच्या तत्त्वाचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

 

 

B.Gokhale/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

 


(Release ID: 1607815)
Read this release in: English