पंतप्रधान कार्यालय
जनता कर्फ्यू म्हणजे एका दीर्घ लढाईची केवळ सुरुवात- पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
22 MAR 2020 10:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मार्च 2020
“कोविड -19 विरुद्धच्या लढाईची ही केवळ सुरुवात असून,अद्यापि पुष्कळ लांबचा पल्ला गाठावयाचा आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशांच्या मालिकेद्वारे म्हटले आहे. ‘लोकांनी आत्मसंतुष्ट होऊ नये' असा इशारा देत, याला यश मानून ते साजरे करण्याचा विचारही करू नये’, असेही त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणतात, “आपण सक्षम आहोत, आणि आपण निश्चय केला तर एकत्रितपणे लढा देऊन मोठ्यात मोठी आव्हानेही परास्त करू शकतो, असे आज देशवासीयांनी दाखवून दिले आहे.”
केंद्र सरकार आणि राज्य सरकारे वेळोवेळी देत असलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. ‘जेथे लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे अशा जिल्ह्यांत व राज्यांत कोणीही घराबाहेर पडू नये, तसेच इतरही ठिकाणी अत्यंत आवश्यकता असल्याशिवाय लोकांनी घराबाहेर पडू नये’ अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
B.Gokhale/J.Waishampayan/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1607758)
आगंतुक पटल : 227
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English