पंतप्रधान कार्यालय
भारतीयांची सुटका करण्याबद्दल पंतप्रधानांकडून एअर इंडियाची प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
23 MAR 2020 4:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मार्च 2020
कोविड-19 या साथीच्या आजारामुळे परदेशी अडकून पडलेल्या भारतीयांची सुखरूप सुटका करून त्यांना मायदेशी आणण्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर इंडियाची प्रशंसा केली आहे.
“मानवतेने घातलेल्या सादेला आत्यंतिक धैर्याने प्रतिसाद देणाऱ्या या @airindiain तुकडीचा अभिमान वाटतो. त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांचे देशभरातील अनेकांकडून कौतुक होत आहे. #IndiaFightsCorona” असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.
B.Gokhale/J.Waishampayan/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1607742)
आगंतुक पटल : 191
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English