पंतप्रधान कार्यालय

कोविड-19 अपत्कालीन निधीमध्ये मालदिवने केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार

प्रविष्टि तिथि: 21 MAR 2020 11:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 मार्च 2020

 

कोविड-19 आपत्कालीन निधीमध्ये मालदिव सरकारने 200,000 अमेरिकी डॉलर्सची मदत दिली आहे. या निधीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदिवचे कौतुक करून मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

‘‘मालदिवने केलेल्या आर्थिक मदतीमुळे महामारी कोविड-19 शी सामना करण्यासाठी संयुक्तपणे लढा उभारण्यास अधिक बळ येईल’’, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

 

 

 

S.Pophale/S.Bedekar/D.Rane

 


(रिलीज़ आईडी: 1607578) आगंतुक पटल : 184
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English