मंत्रिमंडळ

देशातील अत्यंत महत्त्वाच्या प्रारंभिक घटक / औषध माध्यमिक घटक आणि सक्रिय औषधी घटकांच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 21 MAR 2020 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 मार्च 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने खालील योजनांना मान्यता दिली आहे:

  1. पुढील पाच वर्षांत 3,000 कोटी रुपयांच्या उलाढालीसह तीन औषध पार्कसमध्ये सामायिक पायाभूत सुविधांसाठी अर्थसहाय्य प्रदान करण्यास प्रोत्साहन योजना
  2. पुढील आठ वर्षात 6940 कोटी रुपयांच्या उलाढालीसह देशात अतिमहत्वपूर्ण केएसएम / औषध मध्य सामग्री आणि एपीआयच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 'उत्पादन आधारित लाभांश योजने'ला प्रोत्साहन.

 

सविस्तर:

मोठ्याप्रमाणात औषध पार्कला प्रोत्साहन

  1. राज्यांच्या सहकार्याने भारतात तीन मेगा औषध पार्कस विकसित करण्याचा निर्णय.
  2. भारत सरकार प्रत्येक बल्क औषध पार्कसाठी राज्य सरकारला कमाल 1,000 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य प्रदान करेल.
  3. प्रत्येक पार्कमध्ये सॉल्व्हेंट रिकव्हरी संयंत्र, उर्धपतन संयंत्र, ऊर्जा आणि वाफ संयंत्र, सामायिक सांडपाणी प्रक्रिया संयंत्र आदी सामायिक सुविधा उपलब्ध असतील.
  4. या योजनेत पुढील 5 वर्षासाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

 

उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना

  1. निवडक 53 अतिमहत्वाच्या बल्क औषधाच्या योग्य उत्पादकांसाठी पुढील 6 वर्षांच्या कालावधी दरम्यान मदत दिली जाईल जी उत्पादन वृद्धीवर आधारित असेल आणि यासाठी 2019-20 हे आधारवर्ष मानले जाईल.
  2. निवडक 53 अतिमहत्वाच्या बल्क औषधांपैकी 26 आंबविणे प्रक्रिया आधारित औषधे  असून, 27 रासायनिक संश्लेषण औषधे आहेत. आंबविणे प्रक्रिया आधारित बल्क औषधांसाठी प्रोत्साहन दर 20% असेल तर रासायनिक संश्लेषण आधारित बल्क औषधांसाठी प्रोत्साहन दर 10% असेल.
  3. पुढील 8 वर्षांसाठी 6,940 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

 

 

 परिणाम:

बल्क औषध  पार्कसला  प्रोत्साहन:

या योजनेमुळे देशातील मोठ्या प्रमाणत होणारा बल्क औषधांवरील खर्च आणि बल्क औषधांबाबतची  इतर देशांवरील निर्भरता कमी होईल अशी आशा आहे.

 

उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना

  1. अत्यंत महत्त्वाच्या केएसएम / औषध माध्यमिक आणि एजीआयमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करून घरगुती उत्पादनास प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. यामुळे एपीआय उत्पादनात केएसएम / औषध मध्यस्थ आणि इतर देशांवरील भारताचे अवलंबन कमी होईल.
  2. यामुळे पुढील 8 वर्षात विक्रीमध्ये 46,400 कोटी रुपयांची वृद्धी होईल आणि रोजगार निर्मितीमध्ये लक्षणीय वाढ होईल.

 

अंमलबजावणी

बल्क औषध  पार्कसला  प्रोत्साहन:

संबंधित राज्य सरकारांनी स्थापन केलेल्या राज्य अंमलबजावणी एजन्सी (एसआयए) द्वारे ही योजना राबविली जाईल. नजीकच्या भविष्यात मेगा बल्क औषध पार्क्स स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे.

 

उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना

औषध विभागाने नेमून दिलेल्या प्रकल्प व्यवस्थापन संस्थेद्वारे या योजनेची अंमलबजावणी केली जाईल. ही योजना केवळ निर्धारित 53 अतिमहत्वाच्या बल्क औषधांसाठी लागू असेल.

 

फायदे:

  1. 3 बल्क औषध पार्कच्या या योजनेअंतर्गत मिळालेल्या आर्थिक मदतीने सामायिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील.
  2. यामुळे देशातील बल्क औषधांचा उत्पादन खर्च आणि इतर देशांवरील अवलंबत्व कमी होईल अशी अपेक्षा आहे.

 

पार्श्वभूमी:

भारतीय औषध उद्योग हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा औषध उद्योग आहे. असे असले तरीही भारत मुलभूत कच्च्या मालासाठी इतर देशांवर अवलंबून आहे. नागरिकांना परवडणारी आरोग्य सेवा मिळावी यासाठी औषधांचा निरंतर पुरवठा होणे गरजेचे आहे.

 

 

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane

 



(Release ID: 1607537) Visitor Counter : 263


Read this release in: English