पंतप्रधान कार्यालय

उद्या सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत 'जनता कर्फ्यू' पाळण्याचे आवाहन


उद्या संध्याकाळी 5 वाजता देशाची निःस्वार्थपणे सेवा करणाऱ्यांचे आभार मानण्याचेही केले आवाहन

Posted On: 21 MAR 2020 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 मार्च 2020

 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न म्हणून उद्या 22 मार्च रोजी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत 'जनता कर्फ्यू' पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केले आहे.

या कठीण काळात देशाची निःस्वार्थपणे सेवा करणाऱ्यांच्या प्रयत्नांना सलाम करण्यासाठी सर्व नागरिकांनी उद्या संध्याकाळी 5 वाजता आपापल्या घराच्या दरवाज्यात किंवा बाल्कनीत उभे राहून पाच मिनिटे टाळया वाजवून किंवा घंटानाद करून या सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.

 

 

 

 

 

 

S.Pophale/S.Kane/D.Rane

 (Release ID: 1607536) Visitor Counter : 206


Read this release in: English