वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

मास्क, व्हेंटिलेटर व मास्कसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी

Posted On: 20 MAR 2020 5:51PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 20 मार्च 2020

 

व्हेंटिलेटर, सर्जिकल/डिस्पोजेबल मास्क (2/3 प्लाय) तसेच मास्क व संपूर्ण शरीराला झाकणाऱ्या कपड्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची निर्यात करण्यास त्वरित मनाई करण्यात आली आहे. वाणिज्य व उद्योग मंत्रालय, विदेश व्यापार महासंचालनालयाने जारी केलेल्या अधिसूचना (क्र. 52/2015-2020) मध्ये असे म्हटले आहे की निर्यात धोरणात यासंदर्भात बदल करण्यात आले आहेत.

सर्जिकल / डिस्पोजेबल (2/3 प्लाय) मास्क वगळता दि. 25.2.2020च्या अधिसूचना क्र. 48 मध्ये परवानगी असलेल्या इतर सर्व वस्तू निर्यात केल्या जाऊ शकतात.

 

MC/SP/PK


(Release ID: 1607393) Visitor Counter : 133


Read this release in: English