केंद्रीय लोकसेवा आयोग
नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2019 च्या व्यक्तिमत्त्व चाचण्या (मुलाखती) ला स्थगिती
प्रविष्टि तिथि:
20 MAR 2020 5:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मार्च 2020
नोव्हेल कोरोना व्हायरस (COVID – 19) च्या परिस्थितीमुळे, खबरदारीचा उपाय म्हणून, केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2019 मधील उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्व चाचणी (मुलाखती) पुढे ढकलल्या आहेत. 23 मार्च, 2020 ते 3 एप्रिल, 2020 या काळात या मुलाखती होणार होत्या. पुढील आदेश येई पर्यंत या मुलाखती स्थगित करण्यात आल्या आहेत. व्यक्तिमत्त्व चाचणीच्या (मुलाखती) नवीन तारखांची माहिती येणाऱ्या काळात उमेदवारांना दिली जाईल.
R.Tidke/S.Tupe/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1607376)
आगंतुक पटल : 125
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English