माहिती आणि प्रसारण मंत्रालय
कोविड 19 संदर्भात नवीन सूचना जाहीर
Posted On:
19 MAR 2020 6:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मार्च 2020
कोविड 19 संदर्भात नवीन सूचना जाहीर झाल्या असून त्या खालीलप्रमाणे -
- 22 मार्चपासून एक आठवडा कोणतेही नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमान भारतात येण्यास परवानगी नाही.
- राज्य सरकारांनी अधिसूचना काढून 65 वर्षांवरील व्यक्तींना घराबाहेर (वैद्यकीय कामाव्यतिरिक्त) पडू नये, असा सल्ला द्यावा.
- त्याचप्रमाणे 10 वर्षाखालील मुलामुलींना घराबाहेर पडू देऊ नये.
-रेल्वे आणि हवाई वाहतूक विभागाने सर्व प्रकारच्या प्रवासी सवलती रद्द कराव्या, (अपवाद: विद्यार्थी, रुग्ण आणि दिव्यांग)
-राज्य सरकारांनी खासगी क्षेत्राला घरुन काम करण्याची मूभा द्यावी.
- गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्याआड व वेगळ्या वेळांमध्ये कार्यालयात हजर राहण्याची सूचना.
B.Gokhale/P.Kor
(Release ID: 1607228)
Visitor Counter : 221