पंतप्रधान कार्यालय

कोविड-19 ला आळा घालण्याबाबत सार्क नेत्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सच्या समारोप प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 15 MAR 2020 9:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 मार्च 2020

 

महामहीम,

आपण वेळ दिल्याबद्दल आणि आपण मांडलेल्या कल्पनांबद्दल पुन्हा एकदा आभार. आज अतिशय फलदायी आणि ठोस चर्चा झाली.

अशा आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी सामायिक धोरण विकसित करणे महत्वाचे आहे यावर  आपणा सर्वांचे एकमत झाले आहे.

सहकार्याने यावर तोडगा काढण्यालाही सर्वांनी मान्यता दिली आहे, आपण याबाबत माहिती, उत्तम प्रथा, क्षमता आणि जिथे शक्य आहे तिथे संसाधने यांचे आदान प्रदान करण्याला मान्यता दिली आहे.

औषधे आणि उपकरणे याबाबत काहीनी विशिष्ट विनंती केली आहे. माझ्याकडून संबंधीतानी याची दखल घेतली आहे. आमच्या शेजाऱ्यासाठी सर्वतोपरी काम करण्याचे आश्वासन मी देतो.

भागीदारी आणि एकजुटीने काम करण्याच्या भावनेने, आपल्या अधिकाऱ्यानी, सामायिक धोरण विकसित करण्यासाठी परस्परांशी दृढ संपर्क ठेवावा.

आपल्या प्रत्येक देशातले नोडल तज्ञ निश्चित करून आजच्या आपल्या चर्चेबाबत पुढच्या प्रगतीचा आढावा त्यांनीही आठवड्यातून एकदा अशीच व्हिडीओ कॉन्फरन्स घ्यावी.

महामहीम,

आपणा सर्वाना एकत्रितपणे हा लढा द्यायचा आहे आणि एकत्रित त्यात यशही मिळवायचे आहे.

आपला सहकार्याचा शेजारधर्म हा जगातला आदर्श ठरावा.

आपल्या नागरिकांचे उत्तम आरोग्य आणि या महामारीचा मुकाबला करण्यासाठी आपल्या एकत्रित प्रयत्नांच्या यशाची आशा करत मी समारोप करतो.

धन्यवाद.

 

 

D.Wankhede/N.Chitale/D.Rane


(Release ID: 1606483) Visitor Counter : 139


Read this release in: English