पंतप्रधान कार्यालय

कोविड-19ला आळा घालण्याबाबत सार्क नेत्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समधे पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 15 MAR 2020 7:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15  मार्च  2020

 

महामहीम,

इतक्या अल्पावधीत या विशेष चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मी आपणा सर्वाना धन्यवाद देतो. नुकत्याच झालेल्या शस्त्रक्रियेनंतर लगेचच या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आमचे मित्र पंतप्रधान ओली यांना मी धन्यवाद देतो. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी आशा करतो. राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांच्या फेर निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.

आपल्याबरोबर सार्कचे नवे महासचिव आज आहेत त्यांचेही मी स्वागत करतो. गांधीनगरहून सार्क आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या संचालकांच्या उपस्थितीचेही मी स्वागत करतो.

महामहीम, जागतिक आरोग्य संघटनेने कोविद-19 ला महामारी म्हणून वर्गीकृत केल्याचे आपण सर्व जाणताच.

आतापर्यंत आपल्या प्रदेशात 150 पेक्षा कमी प्रकरणे दाखल झाली आहेत. मात्र आपल्याला दक्ष राहण्याची गरज आहे.

आपल्या क्षेत्रात जगातली सुमारे एक पंचमांश लोकसंख्या वास्तव्य करते. दाट लोक संख्येचा हा प्रदेश आहे.

विकसनशील देश म्हणून आपणा सर्वांपुढे आरोग्य सुविधा प्राप्त करून देण्यासंदर्भात अनेक महत्वपूर्ण आव्हाने आहेत.

आपणा सर्व देशातल्या नागरिकांमध्ये प्राचीन काळापासून संबंध आहेत आणि आपला समाज परस्परांशी जोडला गेला आहे.

म्हणूनच आपण सर्वानी मिळून तयारी करायला हवी, सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे आणि सर्वांनी मिळून यात यशस्वी व्हायला हवे.

महामहीम,

या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी आपण सर्व सज्ज आहोत, या विषाणूशी लढा देण्यातला भारताचा अनुभव मी आपणा सर्वाना संक्षिप्त रूपाने सांगू इच्छितो.

‘सज्ज राहा मात्र घाबरू नका’, हा आमचा मार्गदर्शक मंत्र राहिला आहे.

ही समस्या कमी लेखली जाऊ नये मात्र कोणतेही पाऊल घाई गडबडीत उचलले जाऊ नये याबाबत आम्ही सावध होतो.

महामहीम,

जानेवारीच्यामध्यापासूनच भारतात प्रवेश करतानाच आम्ही तपासणी सुरु केली त्याच बरोबर हळू-हळू प्रतिबंध लावायला सुरवात केली.

हळू-हळू हा दृष्टीकोन स्वीकारल्यामुळे यासंदर्भातल्या भीतीला आळा घालण्यासाठी आम्हाला मदत झाली.

दूरचित्रवाणी, मुद्रित माध्यमे आणि सोशल मिडियावर जागरूकता अभियानाची व्यापकता आम्ही वाढवली.

अति संवेदनशील समूहांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले.

देशभरातआरोग्य कर्मचाऱ्याना प्रशिक्षित करण्यासह तंत्र क्षमता वेगाने वाढवण्यासाठीही आम्ही काम केले.

निदान करण्याच्या क्षमतेतही आम्ही वृद्धी केली. दोन महिन्यांच्या आतच आम्ही देशभरातल्या 60 पेक्षा अधिक प्रयोग शाळात परीक्षणाची व्यवस्था केली.

या विषाणू बाबत व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर आम्ही या साथरोगाच्या संदर्भात नियम निश्चित केले. प्रवेशाच्या टप्य्यावरच तपासणी करणे, संशयास्पद प्रकरणी संपर्क साधण्यासाठी माहिती, विलगीकरण सुविधांसाठी व्यवस्था करणे, ज्यांच्याबाबत आता काळजीचे कोणतेही कारण नाही अशांना घरी पाठवणेयासंदर्भात आम्ही नियम केले.

परदेशातल्या आमच्या लोकांच्या विचारणानानाही आम्ही उत्तर दिले. विविध देशात अडकलेल्या सुमारे 1400 भारतीयांची आम्ही सुटका केली. शेजाऱ्याना प्रथम मदत या धोरणाला अनुसरून आम्ही आपणा सर्वांच्या देशातल्या काही नागरिकाचीही आम्ही मदत केली.

अशा भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी आम्ही एक नियमावली केली. इतर देशातले नागरिकही भारतातल्या आपल्या नागरिकांबद्दल चिंतीत असतील हे लक्षात घेऊन आम्ही आम्ही उचलत असलेल्या पावलाबद्दल विदेशी राजदुताना माहिती दिली.

आपणसर्वजण एका अज्ञात स्थितीत आहोत हे आम्ही जाणतो. आपण प्रयत्न करूनही पुढची परिस्थिती कशी असेल याचा निश्चित अंदाज आपण बांधू शकत नाही.

आपल्यालाही अशा चिंतेला तोंड द्यावे लागत असेल. म्हणूनच आपण सर्वांनी आपला दृष्टीकोन परस्परांना विषद करणे महत्वाचे आहे.

आपणा सर्वांचे विचार ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे.

धन्यवाद.

 

 

D.Wankhede/N.Chitale/D. Rane


(Release ID: 1606476) Visitor Counter : 138


Read this release in: English