नौवहन मंत्रालय
जेएनपीटीतल्या 5 प्रकल्पांचे उद्या मन्सुख मांडवीया यांच्या हस्ते उद्घाटन
मांडवा इथे रविवारी रो पॅक्स टर्मिनल आणि रो पॅक्स जहाजाचेही उद्घाटन
Posted On:
13 MAR 2020 6:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मार्च 2020
नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मन्सुख मांडवीया उद्या मुंबईत जेएनपीटीतल्या 5 प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. उद्या दुपारी 12 वाजता मांडवीया जेएनपीटीचा दौरा करणार आहेत आणि पुढील प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.
- जेएनपीटीमध्ये पोर्ट यूझर्स बिल्डिंगजवळ वाय जंक्शन इथे पुलाचे निर्माण
- केंद्रीकृती पार्किंग प्लाझा
- स्कॅनिंग एक्स रे
- 220/33 केवी मास्टर यूनिट सबस्टेशन
आणि
- शिव समर्थ स्मारक वस्तुसंग्रहालय
मांडवीया 15 मार्चला सकाळी 11.30 वाजता मांडवा इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रो पॅक्स जहाजाचे आणि टर्मिनलचे उद्घाटन करणार आहेत.
रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातले मांडवा हे महत्वाचे प्रवासी बंदर आहे. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान वर्षाला सुमारे 15 लाख प्रवासी प्रवास करतात.
मुंबई पोर्ट ट्रस्टने 31 कोटी रुपये खर्च करुन रो पॅक्स सेवेसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. रो पॅक्स प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सागरी मंडळाने मांडवा इथे पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. या कामांवर 135.29 कोटी रुपये खर्च झाला असून, 30 मे 2018 ला ते पूर्ण झाले आहे.
रो पॅक्स सेवेसाठी आणि मांडवा येथील टर्मिनलसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने मे. एस्क्वायर शिपिंग ॲण्ड ट्रेडिंग प्राइवेट लिमिटेडसह 3 डिसेंबर 2019 ला करार केला. तर, मुंबई पोर्ट ट्रस्टने रो पॅक्स टर्मिनलच्या कार्यान्वयासाठी 19 डिसेंबर 2019 ला करार केला.
रो पॅक्स जहाज एम2एम-1 सप्टेंबर 2019 मध्ये ग्रीसला बांधण्यात आले असून, एकावेळी एक हजार प्रवासी आणि 200 गाड्या वाहून नेण्याची क्षमता या जहाजाची आहे. मांडवापर्यंतचा प्रवासाचा कालावधी 45 मिनिटे ते 1 तासाचा असून, यामुळे रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी होण्यास आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत मिळणार आहे.
B.Gokhale/S.Kakade/D.Rane
(Release ID: 1606370)
Visitor Counter : 94