मंत्रिमंडळ

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


वाढ 1 जानेवारी 2020 पासून लागू

प्रविष्टि तिथि: 13 MAR 2020 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मार्च 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करायला मंजुरी देण्यात आली. 1 जानेवारी 2020 पासून ही वाढ लागू राहणार आहे. मूळ वेतन / निवृत्तीवेतनाच्या 17 टक्के दर सध्या आहे.

यामुळे सरकारी तिजोरीवर प्रतिवर्षी 12,510.04 कोटी रुपयांचा भार पडणार असून, 2020-21 या वर्षात (जानेवारी 20 ते फेब्रुवारी 21 असा 14 महिन्यांचा कालावधी) 14,595.04 कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

या निर्णयाचा लाभ केंद्र सरकारच्या 48.34 लाख कर्मचाऱ्यांना आणि 65.26 लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार आहे.

 

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane


(रिलीज़ आईडी: 1606351) आगंतुक पटल : 297
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English