पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा
Posted On:
12 MAR 2020 9:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मार्च 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यात आज दूरध्वनीवरुन चर्चा झाली.
नव्या दशकात दोन्ही देशांमधली धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याची इच्छा दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. यासाठी सर्वसमावेशक आराखडा करण्यात हे उपयुक्त ठरेल, यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.
हवामान बदलाबाबत द्विपक्षीय सहकार्याबद्दल विशेषत: आपत्तीत उपयुक्त पायाभूत सुविधेतील सहकार्याबाबत दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. ग्लासगो इथे या वर्षाच्या उत्तरार्धात होणाऱ्या कॉप-26 साठी दिलेल्या आमंत्रणाबाबत पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान जॉन्सन यांचे आभार मानले.
कोविड-19 साथीबाबतही दोन्ही पंतप्रधानांनी चर्चा केली. इंग्लंडच्या आरोग्यमंत्री नदिन डॉरिस यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली आणि त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
पंतप्रधानांनी मोदी यांनी जॉन्सन यांना भारतभेटीचे पुन्हा आमंत्रण दिले.
B.Gokhale/S.Kakade/D.Rane
(Release ID: 1606274)