कंपनी व्यवहार मंत्रालय
आपला दर्जा अद्ययावत करण्यासाठी निधी कंपन्यांना केंद्र सरकारकडे अर्ज करणे आवश्यक
प्रविष्टि तिथि:
12 MAR 2020 5:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मार्च 2020
निधी कंपन्यांचे नियमन प्रभावीपणे करण्यासाठी आणि देशातील कॉर्पोरेट क्षेत्र पारदर्शक आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल राहावे, यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच कंपनी कायदा आणि नियम अंतर्गत निधी कंपन्यांशी संबंधित तरतुदींमध्ये सुधारणा केल्या आहेत. (15.08.2019 पासून लागू)
कंपनी कायदा (कलम 406) आणि निधी नियम यानुसार निधी कंपन्यांना अर्ज एनडीएच-4 मध्ये आपला दर्जा अद्ययावत करण्यासाठी किंवा स्वत:ला निधी कंपनी घोषित करण्यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच गुंतवणूकदारांना कोणतीही गुंतवणूक किंवा ठेव करण्यापूर्वी केंद्र सरकारच्या अधिकृत राजपत्रात जारी केलेल्या अधिसूचनेमधून निधी कंपनीची स्थिती पडताळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
B.Gokhale/S.Kakade/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1606116)
आगंतुक पटल : 150
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English