कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

पावणेपाच लाखांहून अधिक पदे लवकरच भरणार - डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 12 MAR 2020 4:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मार्च 2020

 

4 लाख 75 हजारांहून अधिक पदे लवकरच भरणार असल्याचे कार्मिक, तक्रारनिवारण आणि निवृत्तीवेतन खात्याचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले.

वर्ष 2019-20 या वर्षात केंद्रीय लोक सेवा आयोग (यूपीएससी), कर्मचारी निवड आयोग (एसएससी) आणि रेल्वे भर्ती मंडळे (आरआरबी) यांनी भर्तीसाठी पुढीलप्रमाणे शिफारस केली आहे.

यूपीएससी

4,399

एसएससी

13,995

आरआरबी

1,16,391

एकूण

1,34,785

 

याखेरीज टपाल विभाग आणि संरक्षण मंत्रालयाने अतिरिक्त 3,41,907 रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु केली असल्याची माहिती ही सिंह यांनी दिली.

 

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane


(Release ID: 1606082)
Read this release in: English