आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

विलगीकरण कक्ष आणि विलगीकरण केंद्रांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना बाधित राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बोलावली बैठक


मेदांता आणि सफदरजंग रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काही रुग्णांशी केंद्रीय मंत्र्यांनी केली चर्चा

उपचार आणि काळजीबद्दल समाधान व्यक्त केले

सर्व रुग्ण बरे होण्याची चिन्ह आहेत; ते वैद्यकीय दृष्ट्या स्थिर आहेत - डॉ. हर्षवर्धन

Posted On: 10 MAR 2020 3:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 मार्च 2020

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रुग्णालयांतील  कोविड-19 बाधित रुग्णांच्या विलगीकरण कक्षांच्या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी दिल्ली, हरियाणा, केरळ, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री तसेच लडाख, जम्मू आणि काश्मिरच्या ले. गव्हर्नरस्तरीय बैठक आज  बोलावली होती.

डॉ. हर्षवर्धन यांनी आज  आरोग्य खात्याच्या कार्यालयातून कोविड-19च्या परिस्थितीवर लक्ष ठेवताना, रुग्ण त्यांचे आरोग्य आणि विलगीकरण कक्षातील मिळणाऱ्या उपचारांबाबत   व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून समाधान व्यक्त केले  रुग्णांशी बोलताना त्यांनी सांगितले कीरुग्णांशी प्रत्यक्ष संवाद त्यांना  साधायचा आहे, परंतु  रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी अशा भेटीसाठी नकार दिला

अशा भेटीमुळे रुग्णांच्या नियमित उपचार पद्धतीत अडथळा येऊ शकतो. रुग्णांनी त्यांना मिळणाऱ्या उपचारांबद्दल समाधान व्यक्त केले तसेच वेगाने बरे होण्यासाठी उत्सुकता दर्शविली आहे. रुग्णांना वेळोवेळी मिळणाऱ्या सहकार्यामध्ये शासनाच्या भूमिकेबाबत आणि दिवसातून तीनवेळा रुग्णांच्या परिस्थितीचा नियमित होणारा आढावा याबाबत त्यांनी कौतुक व्यक्त केले.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वतीने आणि स्वतःच्या वतीने त्यांनी रुग्णांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

डॉ. हर्ष वर्धन यांनी स्वतः दिल्लीचे आरोग्यमंत्री श्री सत्येंद्र जैन, हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज, केरळाच्या आरोग्यमंत्री  के.के.शैलजा, तेलंगणाचे आरोग्यमंत्री इटला राजेंद्र, कर्नाटकचे आरोग्यमंत्री  बी. क्षीरामालू, राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, पंजाबचे आरोग्यमंत्री श्री बी.एस. सिधू, उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री   प्रताप सिंग आणि लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर.के. माथूर आणि जम्मू आणि काश्मिरचे जी.सी. मुरमू यांच्याशी संपर्क साधला आणि रुग्णांच्या स्थितीबाबत आणि जर काही अडचणी येत असतील तर त्याबाबत अभिप्राय जाणून घेतला. राज्य / केंद्रशासित प्रदेश यांच्याकडून वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) (पीपीई), मास्क यांची गरज आणि उपलब्धतेबाबत माहिती घेतली आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या क्षमता वाढविण्याबाबत चर्चा केली. आरोग्य मंत्री आणि लेफ्टनंट गव्हर्नर यांनी उपचारांची सद्यस्थितीची माहिती देताना सांगितले की रुग्ण उत्तमरितीने बरे होत आहेत आणि आता वैद्यकीयदृष्ट्या स्थिर आहेत. रुग्णांना त्यांच्या उपचाराच्या काळात रुग्णालयात किंवा त्यांच्या विलगीकरण कक्षात कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही.

केंद्रीय मंत्र्यांनी  राज्यांकडून घेतल्या जाणाऱ्या परिश्रमांचा उल्लेख केला. केंद्र सरकारबरोबर सातत्य आणि सहकार्य ठेवून कष्ट केल्यामुळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी भारतातीलच नाही तर भारताला भेट देणाऱ्या परदेशी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे, डॉ. हर्ष वर्धन यांनी आरोग्य मंत्री आणि लेफ्टनंट गव्हर्नर यांना रुग्णांच्या आरोग्य स्थितीवर आणि एकूणच सगळ्या परिस्थितीवर सातत्याने बारकाईने नजर ठेवण्यास सांगितले आहे. याशिवाय, त्यांनी कोविड-19 बाबत सर्व सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबाबत विनंती केली.  गर्दीने होणारे मेळावे टाळण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले तसेच वैयक्तिक स्वच्छता आणि प्रतिबंध या मूलभूत तत्वांचे अनुसरण करण्याबाबत भारत सरकारने विविध सल्लागारांना संपर्काच्या विविध माध्यमातून त्यांना उद्युक्त करण्यास सांगितले असून केंद्रीय मंत्र्यांनी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना आणि लेफ्टनंट गव्हर्नर यांना राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी काळजी घेण्याबाबत पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.

 

 

B.Gokhale/S.Shaikh/D.Rane


(Release ID: 1605970) Visitor Counter : 164


Read this release in: English