पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

स्वतंत्र भारतात सामाजिक-आर्थिक परिवर्तन आणि महिला सक्षमीकरण घडवून आणणाऱ्यांमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रमुख घटक-धर्मेंद्र प्रधान

Posted On: 06 MAR 2020 6:15PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 6 मार्च 2020

 

स्वतंत्र भारतात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उत्तम कामगिरी करणाऱ्यांमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उल्लेख करता येईल, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्लीत पंतप्रधान उज्ज्वला योजना संबंधी कार्यशाळेत बोलत होते. गेल्या पाच वर्षात एलपीजी जोडणीत दुपटीने वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. एलपीजी जोडण्यांमुळे घरांघरांमधील प्रदूषण कमी झाले असून महिलांना सुरक्षित आणि पर्यावरणस्नेही इंधन उपलब्ध झाल्याचे ते म्हणाले.

हवामान बदल ही संपूर्ण जगासाठी मोठी समस्या बनल्याचे ते म्हणाले. आर्थिक सक्षमीकरणात ऊर्जा हा महत्त्वाचा घटक असून सर्वांना ऊर्जा न्याय सुनिश्चित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे लाभार्थी या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी त्यांनी आपले अनुभव कथन केले.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor



(Release ID: 1605601) Visitor Counter : 188


Read this release in: English