आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 बाबत ताजी माहिती

Posted On: 05 MAR 2020 1:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 मार्च 2020

 

देशात कोरोना विषाणूची लागण झालेले 29 रुग्ण आढळले आहेत. यापैकी तिघेजण (केरळमधले) बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन आज संसदेच्या दोन्ही सभागृहात निवदेन देत आहेत.

4 मार्च 2020 पासून देशातल्या बहुतांश विमानतळांवर सार्वत्रिक तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी आज राज्यांमधून अतिरिक्त कर्मचारी पाठवण्यात येणार आहेत.

अन्य देशातून येणाऱ्या प्रवाशांबरोबरच देशातही संसर्गाद्वारे कोरोनाची लागण होत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पंचायत समिती स्तरावर जलद प्रतिसाद दलाची स्थापना करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि राज्यांना यात सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोविड-19 रोगाच्या व्यवस्थापनासाठी खासगी क्षेत्रालाही सहभागी करुन घेतले जाणार आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री आज संध्याकाळी बैठक घेणार आहेत.

एकूण 3542 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यापैकी 29 नमुने कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहे. 92 नमुन्यांची तपासणी सुरु असून 23 नमुन्यांची फेरतपासणी केली जात आहे.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 


(Release ID: 1605342) Visitor Counter : 234


Read this release in: English