मंत्रिमंडळ

कंपन्या (दुसरी सुधारणा) विधेयक 2019 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 04 MAR 2020 5:09PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 4 मार्च 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने कंपनी कायदा 2013 मध्ये दुरुस्ती करण्यासाठी कंपनी (दुसरी सुधारणा) विधेयक 2019 ला मंजुरी दिली आहे.

हे विधेयक फसवणूक प्रकरणी या कायद्याअंतर्गत गुन्हेगारी दूर करेल जी वस्तुनिष्ठरित्या निश्चित करता येईल आणि ज्यामध्ये फसवणूक किंवा मोठे जनहित नसेल. यामुळे देशात फौजदारी न्याय व्यवस्थेतली कोंडी दूर होण्यास मदत होईल. तसेच कायद्याचे पालन करणाऱ्या उद्योगांचे जीवनमान सुलभ होईल.

यापूर्वी कंपनी (सुधारणा) कायदा 2015 ने विविध तरतुदींच्या अंमलबजावणीतल्या अडचणी दूर करण्यासाठी काही तरतुदींमध्ये सुधारणा केल्या होत्या.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor


(Release ID: 1605184) Visitor Counter : 148


Read this release in: English