राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींनी 61 वे वार्षिक ललित कला अकादमी पुरस्कार केले प्रदान

प्रविष्टि तिथि: 04 MAR 2020 4:46PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 4 मार्च 2020

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात 15 गुणवंत कलाकारांना 61वे वार्षिक ललित कला अकादमी पुरस्कार प्रदान केले.

या कलाकारांमध्ये अनुप कुमार मनझुखी गोपी, डेव्हिड मलाकार, देवेंद्र कुमार खरे, दिनेश पंड्या, फारुक अहमद हलदर, हरी राम कुंभावत, केशरी नंदन प्रसाद, मोहन कुमार टी, रतन कृष्ण सहा, सागर वसंत कांबळे, सतविंदर कौर, सुनील थिरूवायूर, तेजस्वी नारायण सोनावणे, यशपाल सिंग आणि यशवंत सिंग यांचा समावेश आहे. या कलाकारांच्या कलाकृती 22 मार्च 2020 पर्यंत नवी दिल्लीत ललित कला अकादमीच्या कलादालनात 61 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात पहायला मिळतील.

ललित कला अकादमी दरवर्षी कलेला आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कला प्रदर्शन आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करते.

 

M.Chopade/S.Kane/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1605166) आगंतुक पटल : 141
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English