आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 : सुधारित प्रवास सूचना
Posted On:
03 MAR 2020 6:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2020
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पुढील सूचना जारी केल्या आहेत:-
- इटली, इराण, दक्षिण कोरिया, जपानच्या नागरिकांना 03.03.2020 रोजी किंवा त्यापूर्वी देण्यात आलेले सर्व नियमित व्हिसा/ई-व्हिसा (जपान आणि दक्षिण कोरियासाठीच्या व्हिसा ऑन अरायव्हल सह) आणि ज्यांनी अद्याप भारतात प्रवेश केलेला नाही अशांचा व्हिसा तात्काळ रद्द करण्यात आला आहे. ज्यांना काही कारणामुळे भारतात यायचंच आहे अशांनी जवळच्या भारतीय दूतावासाकडून नव्याने व्हिसा घ्यावा.
- चीनच्या नागरिकांना 5.2.2020 रोजी किंवा त्यापूर्वी जारी करण्यात आलेला नियमित व्हिसा यापूर्वीच रद्द करण्यात आला आहे. हा निर्णय यापुढेही कायम राहील. ज्यांना काही कारणामुळे भारतात यायचंच आहे अशांनी जवळच्या भारतीय दूतावासाकडून नव्याने व्हिसा घ्यावा.
- चीन, इराण,इटली, दक्षिण कोरिया आणि जपानला 1.2.2020 रोजी किंवा त्यानंतर गेलेल्या सर्व परदेशी नागरिकांना देण्यात आलेला व्हिसा तात्काळ रद्द करण्यात आला आहे. ज्यांना काही कारणामुळे भारतात यायचंच आहे अशांनी जवळच्या भारतीय दूतावासाकडून नव्याने व्हिसा घ्यावा.
- राजनैतिक अधिकारी, संयुक्त राष्ट्रांचे आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांचे अधिकारी, ओसीआय कार्डधारक आणि वर उल्लेख करण्यात आलेल्या देशांमधील विमान कर्मचाऱ्यांना प्रवेशावरील या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. मात्र त्यांची वैद्यकीय तपासणी बंधनकारक राहील.
- कुठल्याही विमानतळांवरुन भारतात प्रवेश करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांनी स्वत:ची पूर्ण माहिती (दूरध्वनी क्रमांक, भारतातला पत्ता) आणि पूर्व- प्रवासासंबंधी माहिती विमानतळावरच्या आरोग्य अधिकारी आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांना देणे गरजेचे आहे.
- प्रतिबंधित प्रवाशांखेरीज (भारतीय आणि परदेशी) चीन, दक्षिण कोरिया, जपान, इराण, इटली, हाँगकाँग, मकाऊ, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, नेपाळ, थायलंड, सिंगापूर आणि तैवानहून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भारतात येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर प्रवेश केल्यावर वैद्यकीय तपासणी बंधनकारक राहील.
- भारतीय नागरिकांनी चीन, इराण, कोरिया गणराज्य, इटलीचा प्रवास टाळावा तसेच कोविड-19 ग्रस्त देशांचा अनावश्यक दौरा टाळावा असा सल्ला देण्यात आला आहे.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
(Release ID: 1605031)
Visitor Counter : 310