गृह मंत्रालय
एनआयएने त्यांच्याकडे सोपवलेल्या खटल्यांमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त प्रकरणांचा निवाडा केला: जी. किशन रेड्डी
प्रविष्टि तिथि:
03 MAR 2020 6:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2020
केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज लोकसभेत राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कामगिरीसंदर्भात एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सांगितले कि एनआयए कायदा 2008 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने दहशतवाद संबंधित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिणाम आणि देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडतेला बाधा पोहचवणारे अन्य गुन्हे दाखल असलेल्या खटल्यांची चौकशी करण्यासाठी एनआयएची स्थापना करण्यात आली होती.
स्थापना झाल्यापासून आतापर्यंत केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) 319 प्रकरणे चौकशीसाठी सोपविली आहेत. यापैकी 237 प्रकरणात आरोपपत्र दाखल केले गेले आहे. 62 खटल्यांमध्ये निकाल सुनावण्यात आला असून त्यापैकी 56 प्रकरणांमध्ये एकूण 266 जणांना दोषी ठरविण्यात आले आहे. दोषी ठरवण्याचे प्रमाण 90.32 टक्के आहे, असे रेड्डी यांनी उत्तरात नमूद केले.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1605022)
आगंतुक पटल : 157
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English