पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक तयारीचा घेतला आढावा
प्रविष्टि तिथि:
03 MAR 2020 5:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासंबंधी तयारीचा आढावा घेतला. पंतप्रधान म्हणाले, “ कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासंबंधी तयारीचा विस्तृत आढावा घेतला. विविध मंत्रालये आणि राज्य एकत्रितपणे काम करत असून भारतात येणाऱ्या लोकांची तपासणी केली जात आहे आणि त्यांना त्वरित वैद्यकीय सुविधा पुरवली जात आहे. कोणीही घाबरुन जाऊ नये. आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून स्वत:चा बचाव करण्यासाठी छोट्या परंतु महत्वपूर्ण गोष्टींची काळजी घ्यायला हवी.”
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1604990)
आगंतुक पटल : 168
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English