आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

अद्ययावत सूचना- समर्पित आणि एकत्रित भावनेने केलेल्या प्रयत्नांमुळे 124 जपानी आणि 112 वूहानमधील रुग्णांची सोडवणूक

Posted On: 27 FEB 2020 4:56PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2020

 

119 भारतीयांसह श्रीलंका, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि पेरू इथल्या पाच रुग्णांसह जपानमधला एकूण 124 जणांची एअर इंडियाच्या विमानातून सुटका करण्यात आली.

जपानमधल्या योकोहामा इथल्या डायमंड प्रिन्सेस या जहाजावर कोविड 2019 मुळे हे प्रवासी अडकून पडले होते. या कोविड 2019 संसर्गाचे केंद्रबिंदू असलेल्या वूहान प्रांतातून 76 भारतीयांसह 112 जणांची देखील भारतीय वायूसेनेने विमान पाठवून सुटका केली आहे. बांगला देश, म्यानमार, मालदीव, चीन, दक्षिण आफ्रिका आणि मादागास्कर येथील 36 जणांचा समावेश आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री हर्ष वर्धन यांनी सांगितले.

सुटका झालेले सर्वजण मायदेशी परतले आहेत. जपानमधल्या रुग्णांना मानेसर येथील लष्कराच्या ठाण्यावर तर वुहानवरून आलेल्यांना ठाण्यातल्या इंडोतिबेटन बॉर्डर पोलीस दल अर्थात आयटीबीपी कक्षात ठेवले आहे. डायमंड प्रिन्सेस जहाजावरील 122 पैकी 199 जणांची अत्याधुनिक पीसीआर चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोनाचा संसर्ग न झाल्याचे आढळून आल्यामुळे परत आणले गेले तर तीन भारतीय नागरिकांनी न परतण्याचा निर्णय घेतला. उरलेल्या 16 जणांवर जपानमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या कसोटीच्या प्रसंगी चीनमधल्या नागरिकांबद्दल ममत्व बाळगून भारत सरकारने 15 टन वैद्यकीय सामुग्री चीनमधल्या वुहान येथे पाठवली आहे.

केवळ संवेदना व्यक्त करण्यापेक्षा आपल्या देशातली सर्व मंत्रालये, सैन्यदल, डॉक्टर, एअर इंडिया, राजदूत या व्यतिरिक्त अनेक अनाम वीरांनी केलेल्या कामामुळेच ही मदत करणे शक्य झाले. या सर्वांना मी सलाम करतो असे डॉ. हर्ष वर्धन यावेळी म्हणाले.

‘वसुधैव कुटुंबकम’ हीच आपली संस्कृती आहे असे सांगत भारताने इतर देशातल्या लोकांना देखील या संसर्गापासून वाचवताना स्वयंप्रेरणेने मदत केली यावर हर्ष वर्धन यांनी विशेष भर दिला. भारतीयांनी कोविड 2019 संसर्गाच्या सध्याच्या काळात सिंगापूर, रिपब्लिक ऑफ कोरिया, इराण, इटली या देशांना कारणाशिवाय जाऊ नये, अशा पर्यटनविषयक सूचना सरकारने जारी केल्या आहेत. तसेच खबरदारी म्हणून रिपब्लिक ऑफ कोरिया, इराण, इटली या देशांतून 10 फेब्रुवारी 2020 पासून आलेल्या लोकांना 14 दिवस अलग ठेवण्यात येईल, असेही त्यात म्हटले आहे.

संयुक्त सचिवांसह आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी या प्रातांना भेट देऊन आपण दिलेल्या मदतीवर विशेष लक्ष ठेवून आहेत. या सर्व कामांची मान्यतेसाठी व्यवस्थित यादी केलेली असून ती येत्या 2 मार्च 2020 पर्यंत ती सरकारला दिली जाईल, असेही हर्ष वर्धन यांनी यावेळी सांगितले.

आतापर्यंत 4 हजार 787 उड्डाणांमधून 4 लाख 82 हजार 927 प्रवाशांची चाचणी झाली आहे. नेपाळच्या सीमारेषेजवळ असलेल्या त्याचप्रमाणे देशभरातल्या 21 विमानतळांवर 12 मोठ्या बंदरांवर, 65 छोट्या बंदरांवर सतत तपासणी केली जात आहे. सार्वजनिक दक्षतेसाठी आयडीएसपीच्या नेटवर्क माध्यमातून प्रवाशांची दररोज तपासणी केली जात आहे. 23 हजार 531 प्रवाशांची अशी तपासणी झाली आहे.

2 हजार 836 लोकांपैकी 2 हजार 830 लोकांना लागण झाली नसून ज्या तीन लोकांना लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मानेसर आणि छावला इथल्या लष्कर छावणीतल्या सर्व 645 जणांना 18 फेब्रुवारी 2020 पर्यंत घरी पाठवण्यात आले आहे.

 

B.Gokhale/S.Patgaonkar/P.Kor



(Release ID: 1604542) Visitor Counter : 113


Read this release in: English