मंत्रिमंडळ
अधिकारप्राप्त ‘तंत्रज्ञान गट’ स्थापन करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
Posted On:
19 FEB 2020 7:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2020
केंद्रीय मंत्रिमंडळाने अधिकार प्राप्त ‘तंत्रज्ञान गट’ स्थापन करण्यासाठी मान्यता दिली आहे.
तपशील
केंद्र सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली, 12 सदस्यांच्या तंत्रज्ञान गट स्थापनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या गटाला, अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत वेळेवर धोरणात्मक सल्ला देणे, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान उत्पादनांचे मॅपिंग, राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि सरकारी संशोधन आणि विकास संस्थांमध्ये विकसित तंत्रज्ञानाच्या दुहेरी उपयोगाचे वाणिज्यीकरण निवडक प्रमुख तंत्रज्ञानात स्वदेशीकरणासाठी आराखडा विकसित करण्याचा अधिकार आहे.
प्रमुख प्रभाव
तंत्रज्ञान पुरवठादारासाठी, विकसित करण्यात येणाऱ्या तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान खरेदी धोरणासाठी सर्वोत्कृष्ट सल्ला देणे, नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत तज्ञ आणि कौशल्य विकसित करणे तसेच सार्वजनिक क्षेत्राकडून केल्या जाणाऱ्या संशोधनाची शाश्वतता टिकवणे इ. कामे हा गट करणार आहे.
अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्ट
या गटाच्या कार्याचे तीन प्रमुख स्तंभ राहतील.
धोरणात्मक सहाय्य, खरेदी सहाय्य आणि संशोधन आणि विकास प्रस्तावावर सहाय्य.
भारताकडे आर्थिक विकासासाठी आणि उद्योग क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी प्रभावी, सुरक्षित, अद्ययावत तंत्रज्ञान धोरण आणि रणनीतीची खातरजमा हा गट करेल. विविध क्षेत्रात नव्याने उदयाला येणाऱ्या तंत्रज्ञानाबाबत संशोधनासाठी प्राधान्य आणि रणनीतीबाबत हा गट सरकारला सल्ला देईल. उपलब्ध तंत्रज्ञान तसेच संशोधन होत असलेले तंत्रज्ञान याची अद्ययावत सूची तयार करणे, निवडक प्रमुख तंत्रज्ञानात स्वदेशीकरणासाठी, आराखडा विकसित करण्यासाठीही हा गट काम करेल. तसेच विविध मंत्रालय आणि विभाग तसेच राज्य सरकारे यांना स्वदेशी तंत्रज्ञान निर्मितीसाठी तसेच कृत्रिम बुद्धीमत्ता, विदाशास्त्र (डेटा सायन्स) आदी बाबतीत सल्ला देण्याचे काम हा समूह करेल.
M.Chopade/N.Chitale/P.Kor
(Release ID: 1603751)