संरक्षण मंत्रालय

जहाजे आणि पाणबुड्या यांच्या दुरुस्तीचा आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीचा भारतीय नौदलाकडून आढावा

प्रविष्टि तिथि: 19 FEB 2020 2:09PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2020

 

भारतीय नौदलाची वार्षिक दुरुस्ती परिषद आणि वार्षिक पायाभूत सुविधा आढावा परिषद नौदलाच्या पूर्व कमांड मुख्यालयात, विशाखापट्टणम येथे सुरू आहे. 18 आणि 19 फेब्रुवारी असे दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे अध्यक्षस्थान व्हाईस ॲडमिरल जी. एस. पाबी यांनी भूषवले आहे. नौदलाच्या तिन्ही कमांडचे प्रतिनिधी तसेच अंदमान निकोबार कमांडमधल्या तिन्ही दलांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत. भारतीय नौदलात सध्या कार्यरत असलेली सर्व जहाजे आणि पाणबुड्यांची स्थिती तसेच दुरुस्ती कामांचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. नौदलाच्या वाढत्या गरजांनुसार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आराखडाही यावेळी निश्चित केला जाईल.

पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर, व्हाईस ॲडमिरल अतुल कुमार जैन यांच्या हस्ते या परिषदेचे उद्‌घाटन झाले. नौदलाच्या सर्व शस्त्र आणि उपकरणांची सज्जता ठेवण्यात दुरुस्ती विभागाचे कार्य वाखाणण्यासारखे आहे, असे ते म्हणाले. उत्तम दर्जाची जहाजे आणि पाणबुड्या तयार करण्यात या विभागाने पूर्ण प्रयत्न केले असून विशेषत: समुद्रावर राहणाऱ्या जहाजांमध्ये कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि कार्यक्षमतेवर विशेष मेहनत घेतली आहे, असे त्यांनी सांगितले. नौदलाला लागणारी जहाजे, शस्त्रास्त्र आणि इतर उपकरणे मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत भारतात बनवण्याचा प्रयत्‍न करावा, असे आवाहन त्यांनी संबंधितांना केले.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1603612) आगंतुक पटल : 145
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English