वस्त्रोद्योग मंत्रालय

भौगोलिक मानांकन प्राप्त हस्तकलांना प्रोत्साहन देण्यासाठी कलाकुंभ या हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन

Posted On: 18 FEB 2020 5:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2020

 

भौगोलिक मानांकन (जीआय) हस्तकला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाने कला कुंभ या हस्तकला प्रदर्शनाचे देशाच्या विविध भागात आयोजन केले आहे. वस्त्रोद्योग मंत्रालय विकास आयुक्त (हस्तकला) कार्यालयामार्फत ही प्रदर्शने आयोजित करण्यात येत आहेत. बेंगळुरु आणि मुंबईमधे 14 फेब्रुवारीपासून सुरु झालेले हे प्रदर्शन 23 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. अशाच प्रकारचे प्रदर्शन मार्च महिन्यात कोलकाता आणि चेन्नईमध्येही आयोजित करण्यात येणार आहे.

विशिष्ट भौगोलिक स्थान किंवा शहर, क्षेत्र किंवा देश याच्याशी संबंधित हस्तशिल्पासाठी भौगोलिक मानांकन टॅगचा वापर केला जातो. ऑगस्ट 2019 पर्यंत देशात 178 भौगोलिक मानांकन उत्पादनांची नोंदणी करण्यात आली आहे. कारागीर हे भारतीय हस्तकलेचा कणा आहेत.

 

S.Thakur/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1603556) Visitor Counter : 190


Read this release in: English