रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

15 दिवसांसाठी फास्टटॅग विनामूल्य

Posted On: 12 FEB 2020 6:27PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2020

 

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 15 ते 29 फेब्रुवारी 2020 दरम्यान राष्ट्रीय फास्टटॅगचे 100 रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनचालक आपल्या अधिकृत वैध नोंदणी प्रमाणपत्रासह (आरसी) जवळच्या अधिकृत विक्री केंद्रात जाऊन मोफत फास्टटॅग मिळवू शकतात. अधिक माहितीसाठी www.ihmcl.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा 1033 या हेल्पलाईनवर संपर्क करा. योग्य सुरक्षा ठेवी आणि फास्ट टॅग वॉलेटचे किमान मूल्यामध्ये काहीही फरक करण्यात आलेला नाही.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Kor



(Release ID: 1602999) Visitor Counter : 117


Read this release in: English