गृह मंत्रालय

बिम्स्टेक सदस्य देशांसाठी आयोजित ‘अंमली पदार्थ तस्करी प्रतिबंध परिषदेचे’ केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत उद्‌घाटन

Posted On: 12 FEB 2020 3:01PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2020

 

बिम्स्टेक सदस्य देशांसाठी आयोजित ‘अंमली पदार्थ तस्करी प्रतिबंध परिषदेचे’ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या नवी दिल्ली येथे उद्‌घाटन होणार आहे.

2018 मध्ये काठमांडू येथे झालेल्या चौथ्या बिम्स्टेक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या प्रतिबद्धतेनुसार अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग या परिषदेचे आयोजन करत आहे.

आशियाई देशांना अमली पदार्थांच्या तस्करीचा मोठा फटका बसत असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया यांच्यातील दुवा असलेला बिम्स्टेक सदस्य मंच यासाठी प्रभावी मंच ठरेल.

बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड आणि भारत हे बंगालच्या उपसागरातले आणि लगतच्या सात देश बिम्स्टेकचे (बहुउद्देशीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर उपक्रम) सदस्य आहेत. बँकांनी प्रधानमंत्री जन धन योजना अंतर्गत केलेल्या प्रयत्नांनी ही स्थिती लक्षणीय बदलली आहे. असे म्हणता येईल की इतिहासात यापूर्वी कधीही इतक्या लोकांना औपचारिक आर्थिक व्यवस्थेच्या कक्षेत आणले नव्हते. ही योजना जसजशी प्रगतीपथावर गेली तसतसे अंदाजे 35 कोटी बँक खाती उघडण्यात आली .

 

B.Gokhale/S.Kakade/P.Kor



(Release ID: 1602920) Visitor Counter : 107


Read this release in: English