पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

स्थलांतरित प्रजातींबाबत संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्‌घाटन


परिषदेचे यजमानपद म्हणजे भारतातील वन्यजीव संवर्धनाच्या दिशेने महत्वाचे पाऊल: प्रकाश जावडेकर

Posted On: 10 FEB 2020 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2020

 

संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमांतर्गत करार केलेल्या देशांची, स्थलांतर करणाऱ्या वन्यजीव प्रजातींचे संवर्धन या विषयावर परिषद होणार आहे. गुजरातमधल्या गांधीनगर येथे 17 ते 22 फेब्रुवारी 2020 दरम्यान होणाऱ्या या परिषदेचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवमान बदल खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

या परिषदेचे यजमानपद म्हणजे भारतातील वन्यजीव संवर्धनाच्या दिशेने महत्वाचे पाऊल असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.15 आणि 16 फेब्रुवारीला परिषदपूर्व बैठका होणार आहेत. परिषदेला 130 देशांचे प्रतिनिधी, तज्ञ, वन्यजीव संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय बिगर सरकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, असे जावडेकर यांनी सांगितले.

#India to host 13th COP of the Convention on the Conservation of Migratory Species of Wild Animals (CMS) from 17th to 22nd February 2020
at #Gandhinagar, #Gujarat: Union Minister @PrakashJavdekar#CMSCOP13 @moefcc @MEAIndia pic.twitter.com/wh4VaLZCGf

— PIB India (@PIB_India) February 10, 2020

 

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 

 


(Release ID: 1602698) Visitor Counter : 186


Read this release in: English