संरक्षण मंत्रालय

संरक्षण प्रदर्शनात 200 हून अधिक सामंजस्य करार, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि नवी उत्पादने सुरु करण्यात आली


उत्तर प्रदेश संरक्षण निर्मिती म्हणून उदयाला येईल- संरक्षण मंत्री

प्रविष्टि तिथि: 07 FEB 2020 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी 2020

 

संरक्षण प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवसअखेर 200 हून अधिक सामंजस्य करार, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि नवी उत्पादनांचा प्रारंभ करण्यात आला. अशा प्रकारचे हे भारतातले सर्वात यशस्वी प्रदर्शन ठरले.

पुढल्या 5 वर्षात 5 अब्ज डॉलर्स संरक्षण सामुग्री निर्यातीचे पंतप्रधानांचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने हे सामंजस्य करार महत्वपूर्ण असल्याचे संरक्षण मंत्री म्हणाले. भारताला उदयोन्मुख संशोधन आणि विकास केंद्र बनवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण कंपन्या आणि खाजगी कंपन्या आज उत्तम रितीने काम करत आहेत. सरकारने परवाना पद्धतीचे उदारीकरण केल्यामुळे भारतीय आणि जागतिक कंपन्यांकडून मोठी गुंतवणूक आकर्षित होईल, असे ते म्हणाले. राजनाथ सिंह यांनी सर्व संबंधितांचे आभार मानले तसेच उत्तर प्रदेश उदयोन्मुख निर्मिती केंद्र म्हणून उदयाला येईल, अशी आशा व्यक्त केली.

आज स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या सामंजस्य करारांमध्ये 23 करार उत्तर प्रदेश सरकारचे आहेत. या करारांमुळे राज्यात 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येईल, तसेच 3 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. एचएएल लवकरच डॉर्निअर 19 आसनी विमान लवकरच उत्तर प्रदेशला पुरवेल, अशी घोषणा त्यांनी केली.

हे संरक्षण प्रदर्शन अनेक कारणांसाठी संस्मरणीय ठरेल, असे संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार म्हणाले. या प्रदर्शनात सर्वात जास्त सामंजस्य करार करण्यात आले, तसेच बंधन समारंभात 13 हून अधिक उत्पादनांचा शुभारंभ करण्यात आला.

 

 

S.Tupe/S.Kane/D.Rane


(रिलीज़ आईडी: 1602440) आगंतुक पटल : 219
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English