पंतप्रधान कार्यालय

जम्मू आणि काश्मिरमधल्या लोकांवरील सरकारच्या विश्वासाच्या आधारे कलम 370 रद्द केले गेले


राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर लोकसभेत पंतप्रधानांचे उत्तर

Posted On: 06 FEB 2020 6:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2020

 

कलम 370 रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीरचे देशाच्या उर्वरित भागाशी संपूर्ण एकात्मिकरण झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर लोकसभेत उत्तर दिले.

जम्मू-काश्मीर हा भारताचा मुकूटमणी आहे, असे सांगत पंतप्रधान म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरची खरी ओळख ही सर्व धर्मांप्रती समान अधिकारवादी वृत्ती आणि तिथली सुफी परंपरा ही आहे.

या प्रदेशाला मागे ठेवता येणार नाही, असे सांगत पंतप्रधान म्हणाले की, याचा उल्लेख बंदूका, बॉम्ब, दहशतवाद आणि फुटीरतावादाने त्रासलेला देश असा केला जायचा.

19 जानेवारी 1990चा संदर्भ घेत पंतप्रधान म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमधून बाहेर काढल्यामुळे अनेकांना त्यांची ओळख गमवावी लागली.

आपल्या प्रदीर्घ भाषणात पंतप्रधानांनी काश्मीरमधल्या स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमधल्या लोकांवरील सरकारच्या विश्वासाच्या आधारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या भागाचा विकास जलदगतीने होत आहे.

या प्रदेशावर लादण्यात आलेले निर्बंध हटवले जात असून, केंद्रीय मंत्री या केंद्रशासित प्रदेशाच्या विविध भागांचा दौरा करत आहेत, तिथल्या लोकांकडून थेट प्रतिसाद मिळवत आहेत आणि या प्रतिसादाची सरकार नक्कीच दखल घेईल असे पंतप्रधान म्हणाले.

आपले सरकार जम्मू आणि काश्मीरच्या कल्याणासाठी आणि तिथल्या सर्वांगिण विकासासाठी काम करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

लडाखचा कार्बन न्युट्रल केंद्रशासित प्रदेश म्हणून विकास केला जाईल, असे ते म्हणाले.

 

 

 

S.Tupe/S.Kane/D.Rane



(Release ID: 1602295) Visitor Counter : 265


Read this release in: English