कृषी मंत्रालय
केंद्र सरकारच्या आरोग्य पत्रिका योजनेचे उत्तम परिणाम
दुसऱ्या टप्प्यात 2 वर्षात शेतकऱ्यांना 11.69 कोटी मृदा आरोग्य कार्डांचे वितरण
रासायनिक खतांच्या वापरात 10 टक्के घट
प्रविष्टि तिथि:
05 FEB 2020 7:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2020
जमिनीच्या घटत्या पोषकतेची दखल घेण्यासाठी केंद्रातल्या मोदी सरकारने 2014-15 या वित्तीय वर्षात सुरु केलेल्या मृदा आरोग्य पत्रिका योजनेचे उत्तम परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांना 11.69 कोटी मृदा आरोग्य पत्रिका वितरित करण्यात आल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या सूचनेनुसार कृषी मंत्रालय मृदा आरोग्य पत्रिका वितरित करत आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या पोषकतेबाबत माहिती मिळू शकेल आणि पोषक घटकांचा वापर करुन जमिनीची उत्पादकता वाढवता येत आहे.
राष्ट्रीय उत्पादकता परिषदेने केलेल्या अभ्यासानुसार मृदा आरोग्य पत्रिकेच्या शिफारसी अंमलात आणल्यामुळे रासायनिक खतांच्या वापरात 8-10 टक्के घट झाली असून, उत्पादकता 5-6 टक्के वाढली आहे.
S.Tupe/N.Chitale/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1602138)
आगंतुक पटल : 235
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English