आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोरोना विषाणू संदर्भातल्या तयारीबाबत कॅबिनेट सचिवांनी घेतली उच्च स्तरीय बैठक
प्रविष्टि तिथि:
05 FEB 2020 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2020
कोरोना विषाणूबाबतची सज्जता आणि राज्यांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कॅबिनेट सचिवांनी आज उच्च स्तरीय बैठक घेतली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण, परराष्ट्र व्यवहार, नागरी हवाई वाहतूक, औषध निर्माण, सचिव तसेच गृह मंत्रालय, वाणिज्य, संरक्षण मंत्रालयाचे इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
कोरोनासंदर्भात सध्याची परिस्थिती पाहता प्रवासविषयक सुधारित सूचना जारी करण्यात आल्या आहेत:-
- चीनमधून प्रवास करुन आलेल्या कोणत्याही विदेशी नागरिकाला याआधीच जारी केलेला व्हिसा (ई-व्हिसासह) अवैध.
- जनतेने चीनला प्रवास करणे टाळावे, अशी सूचना याआधीच देण्यात आली आहे. यापुढे चीनला जाणाऱ्या प्रवाशांना तिथून परतल्यानंतर वेगळ्या कक्षात ठेवण्यात येईल.
- प्रवाशांनी भारतीय व्हिसासाठी नव्याने अर्ज करण्याकरता बीजींगमधल्या भारतीय दूतावासाशी (visa.beijing@mea.gov.in ) किंवा शांघाय (Ccons.shanghai@mea.gov.in ), गुआनझाऊ (Visa.guangzhou@mea.gov.in ) इथल्या वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधावा.
- चीनमधल्या भारतीय दूतावासाशी +8618610952903 आणि +8618612083629 या दोन हॉट लाईन क्रमांकावर 24×7 संपर्क साधता येईल. तसेच या ईमेलवरही helpdesk.beijing@mea.gov.in संपर्क करता येईल.
- आरोग्याविषयी अधिक चौकशीसाठी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या +91-11-23978046 या हेल्पलाईन क्रमांकावर अथवा ncov2019[at]gmail[dot]com या ईमेलवर 24×7 संपर्क करता येईल.
S.Tupe/N.Chitale/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1602096)
आगंतुक पटल : 154
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English