आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोरोना विषाणू संदर्भात आरोग्य सचिवांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या तयारीचा घेतला आढावा

Posted On: 04 FEB 2020 6:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2020

 

कोरोना विषाणू संदर्भातल्या व्यवस्थापनाच्या राज्ये / केंद्र शासित प्रदेशांच्या सज्जतेचा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव प्रीती सुदान यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिव, नौवहन, परराष्ट्र व्यवहार, नागरी हवाई वाहतूक, पर्यटन, गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत हा आढावा घेण्यात आला.

केंद्रीय स्तरावर संबंधित मंत्रालयांच्या समन्वयाने विविध खबरदारीच्या उपाय योजना हाती घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, कॅबिनेट सचिव परिस्थितीवर नियमित आणि बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कोरोना संदर्भात सज्जता, आतापर्यंत हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना याबाबत दररोज माहिती घेण्यात येत आहे.

जागतिक पातळीवरची परिस्थिती लक्षात घेऊन नव्या व्हिसाबाबत तात्पुरते निर्बंध घालण्यात आल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. कोरोना संदर्भात सूचनाही जारी करण्यात आल्या असून, यासंदर्भात जागृती निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अधिक दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

21 विमानतळ, आंतरराष्ट्रीय बंदरे आणि सीमांवर प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत 777 विमानांमधल्या 89500 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. 454 नमून्यांची चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी 451 निगेटिव्ह तर तीन पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती त्यांनी दिली.

 

 

 

R.Tidke/N.Chitale/D.Rane



(Release ID: 1601936) Visitor Counter : 113


Read this release in: English