आयुष मंत्रालय

कोरोना विषाणू संदर्भात आयुष मंत्रालयाने दिलेल्या खबरदारीच्या उपायांबाबत स्पष्टीकरण

Posted On: 04 FEB 2020 6:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2020

 

कोरोना विषाणूसंदर्भात आयुष मंत्रालयाने 29 जानेवारी 2020 रोजी खबरदारीच्या उपाययोजना सुचवणारी दोन सूचना पत्रे जनहितार्थ जारी केली होती.

विषाणु प्रार्दुभाव जन्य रोगांच्या संदर्भात सामान्यत: करण्यात येणाऱ्या खबरदारीच्या उपायांचा यात समावेश आहे. कोरोना विषाणूंवर प्रभावी उपचार किंवा कोरोना विषाणू वर कोणतेही विशिष्ट औषध यात सुचविण्यात आलेले नाही. निरोगी राहण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता उपाय आणि काही नैसर्गिक औषधे यात सूचित करण्यात आली आहेत. संबंधित उपचार पद्धतींच्या नोंदणीकृत डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ती घ्यावीत असा सल्लाही देण्यात आला आहे.

माध्यमांमधील काही वृत्त अहवाल आणि काही वैद्यकीय व्यावसायिक संस्था यांमुळे आयुष चिकित्साप्रणालीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोना विषाणूवर अद्याप ठोस उपचार सापडलेला नाही, अशा परिस्थितीत छोटासा उपायही स्वागतार्ह आहे. या दृष्टीकोनातून आयुष मंत्रालयाच्या सूचनांकडे पहायला हवे.

 

 

 

R.Tidke/N.Chitale/D.Rane

 

 


(Release ID: 1601923) Visitor Counter : 228


Read this release in: English